Home भंडारा मनुवादी सरकार खाली खेचा:- प्रा श्याम मानव

मनुवादी सरकार खाली खेचा:- प्रा श्याम मानव

79

आशाताई बच्छाव

1000765854.jpg

मनुवादी सरकार खाली खेचा:- प्रा श्याम मानव

 

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)देशात व महाराष्ट्रात मनुवादी सरकार आले तेव्हापासून राज्यातील अनेक औद्योगिक प्रकल्प स्थानांतरित केल्यामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे तसेच महिलांवर अत्याचार वाढ झाली आहे अशा बाबमुळे भारतीय लोकशाहीत खूप मोठ मोठे आव्हान निर्माण झाले आहेत संविधान बदलून मनुवाद भारतात आणण्याचा प्रयत्न सुरू झाल आहे हे हाणून पाडणे आहेः डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृति जमिनीत गाडून संविधानाची निर्मिती केली आहे तसेच आपल्या देशातील संविधान मुळे नागरिकांना समाज अधिकार व न्याय मिळाला आहे आणि माणूस म्हणून सन्मान जगण्याचा अधिकार मिळाला आहे म्हणून संविधानाचे रक्षण करणे हे देशातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे
असे मत प्रा शाम मानव यांनी व्यक्त केले ते संविधान बचाव महाराष्ट्र बचाव या विषयावर राजकीय विश्लेषण व अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक यांनी आपले मत व्यक्त केले
याप्रसंगी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुरेश झुरमुरे, प्रसिद्ध विचारवंत दशरथ मडावी, संविधान बचाव संघर्ष समितीचे भंडारा जिल्हाध्यक्ष रोशन जांभुळकर, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे भंडारा जिल्हा संघटक डी जी रंगारी , रत्नाकर तिडके,भंडारा जिल्हा अध्यक्ष मदन बांडेबुचे, जिल्हा उपाध्यक्ष ग्यांनचंद जांभुळकर, जिल्हा सचिव मूलचंद कुकडे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक गायधने जिल्हा महिला संघटक प्रियाताई शहारे, कीर्ती गणवीर ,सदानंद इलमे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संविधान बचाव महाराष्ट्र बचाव हा कार्यक्रम संपन्न झाला पुढे म्हणाले की मनुवादी विचारसरणी पुन्हा आपल्या देशात डोके वर काढत आहे व मनुस्मृती लागू करण्याचा प्रयत्न सुद्धा महाराष्ट्रात व देशात लागू करण्याचा प्रयत्न सुरू होत आहे मनुस्मृतीने हजारो वर्ष सुद्रांना गुलाम बनून ठेवले त्याला भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती मातीत गाळून पुन्हा संविधानाची निर्मिती करून देशात स्वातंत्र्य ,समता, बंधुता व सामाजिक न्याय हा विचार भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून रुजवण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणून हाच विचार आपल्याला देशात रुजवण्याकरिता व भारतीय संविधानाची अंमलबजावणी करण्याकरता संविधान मानणारे विचारसरणीचे माणसं सत्तेत आले पाहिजे या दृष्टिकोनातून आमच्या प्रयत्न सुरू आहे त्याकरिता आम्ही सध्या राजकीय भूमिका घेतलेली आहे असे मत त्यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन ग्यांनचद जांभुळकर, यांनी केले तर आभार मुलचंद कुकडे यांनी मानले सभागृह भर गच्च भरलेला होता बहुतांशी कार्यकर्ते जागेअभावी खाली चौकातून शांतपणे प्रा शाम मानव यांच्या विचार ऐकत होते हे विशेष.