आशाताई बच्छाव
साक्री येथे युनियन बँकेतील अधिकारी सुस्त व ग्राहक मात्र त्रस्त
प्रतिनिधी छगन कोळेकर साक्री
साक्री येथे युनियन बँक ऑफ इंडिया
भोंगळ्या कारभारामुळे ग्राहकांना त्रस्त झाले आहे त्यामुळे ग्राहकांना बँक मध्ये अनेक चकरा मारुन सुद्धा त्यांचे काम होत नाही आणि बँक अधिकारी उडवा उडवी चे उत्तरे देऊन ग्राहकांना परत पाठवत आहे त्यामुळे बँक ग्राहकांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे बँक ऑफ युनियन मध्ये येथील खातेधारकांना केवायसी करण्यासाठी तसेच खात्याला आधार कार्ड लिंक करण्यासाठी बँकेमध्ये एक महिन्यापासून चकरा माराव्या लागत आहे कधी बँक अधिकारी म्हणतात तुमची केवायसी झाली तर कधी म्हणतात तुमची केवायसी झाली होती परंतु ते रिजेक्ट झाली आता तुम्हाला पुन्हा केवायसी साठी फॉर्म भरावे लागेल परत तेच उत्तर खात्याला आधार कार्ड लिंक करण्यासाठी देतात त्यामुळे वयोवृद्ध नागरिक आजारी तसेच दिव्यांग ग्राहकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या ग्राहकांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे