आशाताई बच्छाव
प्राविण्यप्राप्त खेळाडूंचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण
भीमआर्मी संघटनेची उपोषणस्थळाला भेट
संजीव भांबोरे
भंडारा,( जिल्हा प्रतिनिधी)- अॉल इंडीया युनीव्हर्सिटी स्तरावरील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना उपसंचालक , क्रिडा व युवक सेवा नागपूर यांनी प्रमाणपत्र पडताळणी न केल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आपल्या न्यायहक्कांसाठी या खेळाडूंनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरूवात केली आहे. न्याय न मिळाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशाराही या प्राविण्यप्राप्त खेळाडूंनी दिला आहे.
याप्रसंगी भीम आर्मीचे भंडारा जिल्हा संपर्क प्रमुख अश्विन गोस्वामी यांनी भेट देवून समस्या जाणून घेतली. प्राविण्यप्राप्त खेळाडू हा देशाची शान आहे. आपल्या अंगी असलेल्या कला-कौशल्याने व कष्टाने तो देशाचे नावलौकीक करण्यात मोलाची भुमिका बजावीत असतो. खेळाडूला अभूतपूर्व कामगीरी पार पाडण्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे असते. परंतु प्रशासनातील अधिकारी याबाबतीत उदासीनता बाळगतात व प्राविण्यप्राप्त खेळाडूंचे भविष्य अंधारात ठेवतात अशा शब्दांत त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. भीम आर्मीचे या लढयाला समर्थन असल्याचे जाहीरही केले.






