Home जालना मौजपुरी येथील अजिंक्य ढोकळे तालुक्यातून प्रथम

मौजपुरी येथील अजिंक्य ढोकळे तालुक्यातून प्रथम

104

आशाताई बच्छाव

1000735936.jpg

मौजपुरी येथील अजिंक्य ढोकळे तालुक्यातून प्रथम

जालना (प्रतिनिधी वसंतराव देशमुख) जालना तालुक्यातील मौजपुरी येथील अजिंक्य सत्यनारायण ढोकळे या विद्यार्थ्याने तालुका स्तरावर घेण्यात आलेल्या 41 वजन गटात 14 वर्षाखालील कुस्ती स्पर्धेत तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावलाय. त्याची आता पुढील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने नुकत्याच शालेय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. दरम्यान या स्पर्धेत मौजपुरी येथील अजिंक्य सत्यनारायण ढोकळे या विद्यार्थ्याने रंगतदार कुस्ती करीत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी कुस्तीचा डाव खेळेत अजिंक्य ढोकळे याने प्रतिस्पर्धकाला चितपट करीत कुस्ती जिंकली. तालुका स्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धेत अजिंक्य ढोकळे याने प्रथम क्रमांक मिळविण्याचा बहुमान मिळविला आहे. या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, सरपंच बद्रीणारायण भसांडे, सत्यनारायण ढोकळे, बालाजी बळप, अंकुश काळे, अच्युत मोरे, कृष्णा हिवाळे यांच्या सह गावकर्‍यांनी अभिनंनद केलंय.

Previous articleस्थानिक गुन्हे शाखेचा टाकळी शिवारात हातभट्टीवर छापा
Next articleश्रीरामपूर मध्ये मतांसाठी धार्मिक तेढ निर्माण करणारे प्रयत्न हाणून पाडा !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.