Home उतर महाराष्ट्र श्रीरामपूर मध्ये मतांसाठी धार्मिक तेढ निर्माण करणारे प्रयत्न हाणून पाडा !

श्रीरामपूर मध्ये मतांसाठी धार्मिक तेढ निर्माण करणारे प्रयत्न हाणून पाडा !

202

आशाताई बच्छाव

1000738677.jpg

श्रीरामपूर मध्ये मतांसाठी धार्मिक तेढ निर्माण करणारे प्रयत्न हाणून पाडा !                                           श्रीरामपूर, दिपक कदम तालुका प्रतिनिधी 

सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजी नगर नंतर आता श्रीरामपूरात धार्मिक दंगली घडवून आणण्याचा समाज कंटकांच्या प्रयत्नांना कदापि सहन केले जाणार नाही, ही भूमिका घेत आज सामाजिक सौहार्द बिघडवणाऱ्या हेट स्पीच देणाऱ्या व्यक्ती व कार्यक्रमांना पायबंद घालावा, अशी मागणी श्रीरामपूर येथील विविध पुरोगामी पक्ष, संघटनांच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे केली आहे.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत धार्मिक तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न अत्यंत नीच प्रवृत्तीचा आहे, सार्वजनिक वातावरण दूषित करून धार्मिक तेढ निर्माण होईल अश्या कार्यक्रमाला बंदी लवकरात लवकर घातली पाहिजे यासाठी आम्ही सर्वच आग्रही आहोत. येणाऱ्या काळात श्रीरामपूरमधील सर्वच नागरिक सार्वजनिक हित आणि शांततेत राहण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.
शिष्टमंडळात अँड. राजेश बोर्ड पाटील, लकी सेठी (राष्ट्रवादी काँग्रेस, एस.पी)
डॉ. वसंत जमधडे (विचार जागर मंच)
जीवन सुरुडे, शरद संसारे (लाल निशाण पक्ष)
डॉ. सलीम शेख,अशोकराव दिवे, (विद्रोही सांस्कृतीक चळवळ)डॉ. जालिंदर घिंगे (विद्रोही सांस्कृतीक चळवळ/ वंचित बहुजन आघाडी) किशोर संचेती (जैन समाज संघटना) सुनील वाघमारे, सागर खरात (वंचित बहुजन आघाडी) कुमार भिंगारे,अमोल सोनवणे (विद्रोही विद्यार्थी संघटना)
फ्रान्सिस शेळके, (भारत मुक्ती मोर्चा) धनंजय कानगुडे (सामजिक कार्यकर्ते)
एस. के. बागुल (बामसेफ) आदी सामील आहेत.

Previous articleमौजपुरी येथील अजिंक्य ढोकळे तालुक्यातून प्रथम
Next articleगोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा असल्याने यंत्रणेने सज्ज राहावे – जिल्हाधिकारी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.