आशाताई बच्छाव
राष्ट्रीय समाज पक्ष ,”बागलाण” विधानसभा नियोजन बैठक संपन्न. नामपूर प्रतिनिधी वामन शिंदे
राष्ट्रनायक महादेव जानकर साहेब यांच्या आदेशाने तसेच प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते व महाराष्ट्र महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्यातील नामपुर या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाची बागलाण विधानसभा नियोजन बैठक पार पडली. बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक राज्याचे प्रदेश सचिव प्रल्हाद पाटील, राज्य कार्यकारणी सदस्य सय्यद बाबा शेख, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शरद बाचकर, उत्तरमहाराष्ट्र महिला आघाडी अनिता बागुल, उपाध्यक्ष शशिकांत मतकर, अहमदनगर जिल्हाध्यक्ष नानासाहेब झुंजारे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. बागलाण विधानसभा राष्ट्रीय समाज पक्ष लढणार असून माननीय जानकर साहेब यांनी सर्व समाजाला बरोबर घेऊन जो अपेक्षित आहे त्याला अपेक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष निर्माण केला असून सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका फक्त महादेव जानकर साहेब यांचीच आहे त्यामुळे सर्वांनी जोमाने कामाला लागावे या तालुक्यातील अनेक मतब्बर नेते आमच्या संपर्कात असून या भागातील आमदार हा राष्ट्रीय समाज पक्षाचा होईल असे वक्तव्य डॉक्टर प्रल्हाद पाटील यांनी केले तसेच येणाऱ्या काही दिवसात प्रदेशाध्यक्ष व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मेळावा घेऊ जिसकी जितनी संख्या भारी उसकी होगी भागीदारी या तत्त्वावर तयारी करून आपल्याला उर्वरित नेमणूक करून संघटन मजबूत बनवा या तालुक्यातील उमेदवार संसदेत पाठवायचे आहे त्यासाठी प्रत्येकाने आपआपल्या आघाडीचे प्रत्येक गावामध्ये किमान पाच पदाधिकारी तयार करावे असं निरीक्षक सय्यद बाबा शेख यांनी सांगितले
सूत्रसंचालक तालुकाध्यक्ष अण्णासाहेब गोयकर यांनी केले तर सर्वांचे आभार जितू भाऊ सूर्यवंशी यांनी मानले.






