Home पुणे फुगेवाडी, दापोडीत बीआरटीमुळे वाहतूक कोंडी..

फुगेवाडी, दापोडीत बीआरटीमुळे वाहतूक कोंडी..

109

आशाताई बच्छाव

1000657671.jpg

फुगेवाडी, दापोडीत बीआरटीमुळे वाहतूक कोंडी..
पुणे ब्युरो चीफ; उमेश पाटील
पिंपरी (दि. १८ ऑगस्ट २०२४) :- फुगेवाडी, दापोडी येथे पुणे मुंबई महामार्गालगत मोठ्या चौकातील सिग्नलजवळ दिवसेंदिवस ट्रॅफिक जॅम होत आहे. वाहतूक विभागाने लक्ष घालून योग्य ते नियोजन करून ट्रॅफिक समस्या सोडवावी, अशी मागणी आम आदमी पार्टीचे माहिती अधिकार आघाडीचे शहराध्यक्ष यलाप्पा वालदोर यांनी निवेदनाद्वारे भोसरी वाहतूक विभागाकडे केली आहे.
सर्वात मोठा अडथळा हा बीआरटीमुळे होत आहे. याचा सामान्य वाहन चालकांना काहीही उपयोग काही. वाहन धारक अनेक टॅक्स भरून सुध्दा स्मार्ट सिटी म्हणवणाऱ्या या शहरात ट्रॅफिकची भयंकर समस्या निर्माण झाली आहे. ती केवळ बीआरटीमुळेच. रोडच्या कडेला मोजक्या काही व्यापाऱ्यांच्या धंद्याला आर्थिक नुकसानीची झळ बसू नये म्हणून कदाचित वाहतूक विभाग आणि बीआरटी विभाग कानाडोळा करीत असावेत. तसेच दापोडी येथील उड्डाणपुलावर दर शनिवारी आणि रविवारी नेहमी सर्रास गाड्या पार्क केल्या जातात, याकडेही ट्रॅफिक पोलिस लक्ष देत नाहीत.
भविष्यात या ट्रॅफिक समस्यांमुळे जर मोठा अपघात होऊन जीवितहानी झाल्यास यास सर्वस्वी पिंपरी वाहतूक विभाग जबाबदार असेल. योग्य ते नियोजन करून निर्णय घ्यावा, असे या निवेदनात म्हटले आहे.

Previous articleबागलाण तालुक्यातील नामपुर येथे डॉक्टर युनियनचा मूक मोर्चा
Next articleफुगेवाडी, दापोडीत बीआरटीमुळे वाहतूक कोंडी..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.