Home नांदेड 78 वा भारतीय स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा.

78 वा भारतीय स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा.

163

आशाताई बच्छाव

1000649804.jpg

78 वा भारतीय स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा.
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
नांदेड देगलुर –फुले शाहू आंबेडकर सेवाभावी संस्था द्वारा संचलित आयडियल इंग्लिश मेडीयम स्कुल देगलूर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वप्रथम महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे स्कूलच्या प्राचार्या सुनंदा मॅडम यांनी पुष्प हार अर्पण करून अभिवादन केले. तसेच पाटील मॅडम, टोटरे मॅडम, शिवानी मॅडम, वाघमारे मॅडम, अंकिता मॅडम,गंगासागर ताई,मिलिंद सर, इसाक शेख,मस्तान शेख आदींनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी स्कुलच्या सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदाने राष्ट्रीय ध्वजास सॅल्यूट करून भारतीय स्वातंत्र्याचा आनंद मोहत्सव साजरा केला.अमृता संदीप कांबळे, आरुषी उत्तम कांबळे, गौतमी गौतम सोनकांबळे,रागिणी मष्णाजी देवदे, स्वरागिने बालाजी देवदे,ऋषीका भालेराव,अनुष्का सूर्यवंशी,श्रुतिका नरबागे,सम्यक कांबळे, प्राप्ती दिलीप कांबळे,सुमित भंडरवार, सार्थक भुताळे, रोहित गौतम सोनकांबळे इ. अनेक विध्यार्थी व विध्यार्थीनी यांनी भारतीय स्वातंत्र्य दिना विषयी भाषणे केली. कार्यक्रमासाठी अनेक पालकांनी आवर्जून उपस्थिती नोंदवली अनुराधा कुऱ्हाडे, बेबीताई कांबळे, चैनपुरे आजी उपस्थित होते.तसेच देशभक्ती पर गीत गायली. यावेळी स्कुल च्या प्राचार्या यांच्या हस्ते राष्ट्रीय तिरंगा ध्वजारोहन करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानी मठवाले आणि वाघमारे मॅडम यांनी केले तर आभार पाटील मॅडम यांनी मानले.

Previous articleसमाज कल्याण कार्यालयात ज्येष्ठ नागरीक व अपंगाच्या सेवेसाठी लिफ्टची सुविधा.
Next articleयुवा ग्रामीण पत्रकार संघाची आढावा बैठक संपन्न.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.