Home उतर महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

31
0

आशाताई बच्छाव

1000604646.jpg

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये अण्णाभाऊ साठे यांचे महत्त्वाचे योगदान -अमित काळे

अहमदनगर (प्रतिनिधी दिपक कदम)- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने सिद्धार्थनगर येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी रिपाईचे युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, महिला जिल्हाध्यक्षा जयाताई गायकवाड, युवक जिल्हा सचिव गौतम कांबळे, युवक जिल्हा सरचिटणीस दया गजभिये, युवक जिल्हा उपाध्यक्ष महादेव भिंगारदिवे, युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रविण वाघमारे, युवक नगर तालुकाध्यक्ष आकाश बडेकर, युवक तालुका सरचिटणीस निखिल सुर्यवंशी, युवक तालुका उपाध्यक्ष अजय पाखरे, भिंगार शहराध्यक्ष मंगेश मोकळ, भिंगार युवक शहराध्यक्ष महेश भिंगारदिवे, ग्रामपंचायत सदस्य शैनेश्वर पवार, सिद्धार्थ ससाणे आदी उपस्थित होते.
अमित काळे म्हणाले की, महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे महत्त्वाचे योगदान आहे. वंचित, घटकांचे नेतृत्व करुन त्यांनी दुबळ्या समाजाला जागृत करण्याचे कार्य केले. शाहिरी, साहित्य, कांदबरी लेखन करून समाज सुधारणेचे अतुलनीय कार्य करुन समाजाला त्यांनी दिशा दिल्याचे सांगितले.
जयाताई गायकवाड यांनी अण्णाभाऊंनी समाज जागृतीचे कार्य करून परिवर्तन घडविण्यासाठी उभे आयुष्य खर्ची केले. अण्णाभाऊंचे अनुयायी म्हणून समाजात कार्य करताना दीन-दुबळ्यांची सेवा करण्याचे त्यांनी आवाहन केले.

Previous articleआपले सरकार पोर्टल असुरळीत; विद्यार्थ्यांचे होतय नुकसान: आ.नमिता मुंदडा
Next articleलोहा येथे बोगस खते विक्री करणाऱ्या कृषी केंद्र चालकावर गुन्हा दाखल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here