Home बीड आपले सरकार पोर्टल असुरळीत; विद्यार्थ्यांचे होतय नुकसान: आ.नमिता मुंदडा

आपले सरकार पोर्टल असुरळीत; विद्यार्थ्यांचे होतय नुकसान: आ.नमिता मुंदडा

167

आशाताई बच्छाव

1000604612.jpg

आपले सरकार पोर्टल असुरळीत; विद्यार्थ्यांचे होतय नुकसान: आ.नमिता मुंदडा

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड/अंबाजोगाई दि:०२ संपूर्ण बीड जिल्ह्यातील आपले सरकार पोर्टल महाऑनलाईन असुरळीत झाले असून सदरील व्यत्ययामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः लक्ष घालावे अशी विनंती आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी केली आहे. या संदर्भात नमिता अक्षय मुंदडा यांनी एका निवेदनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना एक निवेदन दिले असून या निवेदनात असे म्हटले आहे की, बीड जिल्ह्यात सध्यस्थितीत ऑनलाइन प्रमाणपत्रांचे महा ऑनलाईन आपले सरकार पोर्टल सुरळीत नसल्याने विद्यार्थ्यांचे विविध आवश्यक प्रमाणपत्रे व लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे विहित मिळत नसल्याने तक्रारी नागरिकांकडून प्राप्त होत आहेत. सदरचे कामकाजाबाबत तहसील कार्यालय अंबाजोगाई येथे विचारणा केली असता सदरचे पोर्टल हे कार्यालयीन वेळामध्ये ४०४ दाखवत असून सर्वर लोड घेत असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच रात्रीच्या वेळी प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी काम करत असताना पोर्टल हे अत्यंत संथगतीने चालत असल्याचे त्यांनी कळविले आहे. तरी सदर प्रकरणात विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र व मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्र लवकरात लवकर मिळण्याच्या अनुषंगाने सदर पोर्टल लवकरात लवकर सुरळीत सुरू होण्यासाठी आपल्या स्तरावर कारवाई करण्यात यावी. सदर प्रमाणपत्र अभावी कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी कार्यवाही करण्याबाबत आदेश व्हावेत अशी विनंती आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी केली आहे.

Previous articleसिल्लोड येथे ‘मुख्यमंत्रीःमाझी लाडकी बहीण योजने’ चा शुभारंभ
Next articleरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.