आशाताई बच्छाव
भंडारा येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीची सभा संपन्न
संजीव भांबोरे
भंडारा,(जिल्हा प्रतिनिधी) शहरातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यालयात समितीची कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भंडारा जिल्ह्याचे अध्यक्ष मदन बांडेबुचे होते तर प्रमूख अतिथी म्हणून गोंदिया जिल्ह्याचे संघटक डॉक्टर प्रकाश धोटे , तर भंडारा जिल्ह्यातील जिल्हा संघटक डी जी रंगारी, रत्नाकर तीडके , भंडारा जिल्ह्याचे सचिव मूलचंद कूकडे ,जिल्ह्याचे उपाध्यक्ष ग्यानचंद जांभुळकर इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली
बैठकीत मा.प्रा.शाम मानव-रास्ट्रिय संघटक अ.भा.अनिस यांची नागपूर येथे दि.२४/०७/२०२४ ला झालेल्या बैठकीत झालेल्या विषयावर चर्चा करण्यात आली, तसेच सभासद नोंदणी व परीसरात घडलेल्या अंधश्रद्धा बाबद घटनांवर चर्चा करण्यात आली…कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन जिल्ह्याचे सचिव मुलचद कुकडे यांनी केले तर आभार जिल्ह्याचे उपाध्यक्ष ग्यांनचंद जांभुळकर यांनी केलें
भंडारा तालुका अध्यक्ष वीरेंद्र ढबाले, किर्ती गणवीर, रामभाऊ येवले, साकोली तालुका संघटक के एस रंगारी, रविकांत गजभिये व इतर कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.