Home बुलढाणा राजुर घाट वळण रस्ता, बुलढाणा रिंग रोड प्रश्न लागणार मार्गी, आ. गायकवाड...

राजुर घाट वळण रस्ता, बुलढाणा रिंग रोड प्रश्न लागणार मार्गी, आ. गायकवाड यांनी घेतला आढावा…

55
0

आशाताई बच्छाव

1000561972.jpg

राजुर घाट वळण रस्ता, बुलढाणा रिंग रोड प्रश्न लागणार मार्गी, आ. गायकवाड यांनी घेतला आढावा…
युवा मराठा न्यूज संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ
बुलढाणा :-बुलडाणा विधानसभा मतदारसंघात महत्त्वाचे असलेले राजुर घाट वळण रस्ता व बुलढाणा रिंग रोड या दोन प्रश्नालां मार्गी लावण्याच्या कामाला वेग आला आहे. यासंदर्भात नुकतेच बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे धडाडीचे आमदार संजय गायकवाड यांनी संबंधित अधिकारासोबत आढावा बैठक घेतले व विविध सूचना दिल्या. सदर बैठक हीआमदार संजय गायकवाड यांच्या संपर्क कार्यालयात पार पडली.
बुलढाणा ते मोताळा मार्गावर असलेला राजुर घाटात वळण रस्ता हा लहान असल्याने या मार्गावर नेहमीच वाहतुकीची वर्दळ व ट्रॅफिक असते परिणामी वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो सदर वळण रस्ता हा जाण्यासाठी व परत येण्यासाठी दुसरा मार्ग तयार करण्यात यावा या संदर्भात बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता त्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्याने या विषयावर तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते या आदेशाच्या अनुपालन होऊन संबंधित अधिकाऱ्यांना बैठका घेण्याच्या आदेश दिले होते पश्चात बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत या विषयाला चालना देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याची विशेष बैठक मातोश्री संपर्क कार्यालय येथे नुकतेच पार पडली यावेळी यामध्ये सदर मार्गासाठी अंतिम सर्वेक्षण इस्टिमेट करण्याचे आदेशही त्यांनी दिले
बुलढाणा शहराला लागून असलेला रिंग रोड चे काम पूर्ण झाल्यावर शहरातून होणारी वरदळ मोठ्या प्रमाणात कमी होणार असून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
यावेळी बैठकीत राष्ट्रीय महामार्गाच्या अभियंता चव्हाण सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सुभाष राऊत उपविभागीय अभियंता राजेश एकडे आदी मान्यवर उपस्थित होते

Previous article“आषाढी एकादशी आणि मोहराम निमित्त केले दामिनी लघुचित्रपट प्रसारित”
Next articleभारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हा कचेरीवर आंदोलन.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here