Home बुलढाणा छोट्या-मोठ्या कारणांवरून खामगावात चाकू-तलवारी चाल्या, एक गंभीर, चौघांवर गुन्हा दाखल!

छोट्या-मोठ्या कारणांवरून खामगावात चाकू-तलवारी चाल्या, एक गंभीर, चौघांवर गुन्हा दाखल!

112

आशाताई बच्छाव

1000549711.jpg

छोट्या-मोठ्या कारणांवरून खामगावात चाकू-तलवारी चाल्या, एक गंभीर, चौघांवर गुन्हा दाखल!
युवा मराठा न्यूज संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ
खामगाव :-बुलढाणा छोट्या-मोठ्या कारणांवरून खामगावात चाकू-तलवारी चालतात. जणू त्यांना चाकू तलवार चालविण्याचा सराव झाला आहे.खामगावच्या शेजारी असलेल्या घाटपुरी येथे शेजारी-शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबात झालेल्या भांडणात तलवार चालल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

अभिषेक सदाशिव घोपे (२९) रा. पुंडलिक नगर(घाटपुरी,खामगाव)यांच्या घरी ११ जुलै रोजी रात्री साडेआठ वाजताच्या दरम्यान शेजारी राहणारे अंबादास साळोकार (४५), गजानन साळोकार (४०),सौ उषा अंबादास साळोकार (३४), प्रेम अंबादास साळोकार ( सर्व रा. पुंडलिक नगर, घाटपुरी खामगाव) या चौघांनी करून अभिषेक घोपे याला अश्लील शिवीगाळ करत आवाज दिला. त्यामुळे अभिषेक घोपे हा आपल्या घराबाहेर आला होता. यावेळी अंबादास साळोकार यांच्या हातात तलवार तर उषा साळोकार, प्रेम अंबादास साळोकार यांच्या हातात लाकडी दांडके होते. गजानन साळोकार (४०) हा अभिषेक घोपेच्या घरात घुसला व अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर दोघांनी अभिषेक गोपे याचे हात पकडले व अंबादास साळोकार याने त्याच्यावर तलवारीने जोरदार वार केला.घोपे यांनी आपल्या डाव्या हाताच्या मदतीने तो वार अडवला मात्र त्यामुळे त्याच्या डाव्या हाताच्या पंजाला गंभीर दुखापत झाली आहे, तो हात फॅक्चर झाला आहे . यावेळी वरील चौघांनी त्याच्या पायावर, डोक्यावर लाकडी दांड्याने मारहाण केली आहे.अभिषेक घोपे याची पत्नी व साळा भांडण आवरण्यास गेले होते. त्यांना सुध्दा लाथा – बुक्क्यांनी मारहाण केली आहे. घोपे यांच्या लहान मुलांना सुद्धा मारहाण केली आहे. तशी तक्रार अभिषेक सदाशिव घोपे यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला दिली आहे. पुढील तपास पोहेकॉ दिनेश घुगे करीत आहेत.

Previous articleवासनांध! म्हणे.. नाही तर तुझा अश्लील फोटो व्हायरल करील.. – संत नगरी सह बुलडाणा चिखली शहरात घडले पाप !
Next articleजालना पोलीस, जिल्हा परिषद आणि रोटरी क्लब यांच्या वतीने शिक्षकांची कार्यशाळा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.