Home बुलढाणा वासनांध! म्हणे.. नाही तर तुझा अश्लील फोटो व्हायरल करील.. – संत नगरी...

वासनांध! म्हणे.. नाही तर तुझा अश्लील फोटो व्हायरल करील.. – संत नगरी सह बुलडाणा चिखली शहरात घडले पाप !

146

वासनांध! म्हणे.. नाही तर तुझा अश्लील फोटो व्हायरल करील.. – संत नगरी सह बुलडाणा चिखली शहरात घडले पाप !
युवा मराठा न्यूज संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ
बुलढाणा :-शेगाव येथील बस स्थानकावरील लॉज, बुलढाणा शहर संगम चौकातील जयस्वाल प्लाझमा हॉटेल नंतर चिखली येथील लॉजवर एकाने आधी अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल करीत एका विवाहितेवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.
जिल्हा जळगाव खान्देश याने एक सात वर्षाची मुलगी आणि एक मुलगा असलेल्या विवाहितेला ब्लॅकमेल करून फासले. पीडित महिला नंदुरबार येथे एका लग्न कार्यक्रमासाठी गेली होती. कपडे बदलण्यासाठी एका रूममध्ये विवाहिता गेली असताना आरोपींनी खिडकीतून तिचा अश्लील फोटो काढला. दरम्यान चार दिवस तेथेच राहिलेल्या विवाहितेला काढलेला फोटो तुझ्या पतीला व नातेवाईकाला दाखवून मी तुझी बदनामी करीन असे सांगितले. दरम्यान त्याने तिच्याशी लगट वाढवली. वारंवार फोन करू लागला. एका दिवशी खामगाव येथे आरोपी आला आणि मला तुझ्याशी बोलायचं आहे म्हणून भेटण्यास बोलाविले. दुचाकी वर बसून शेगावच्या रस्त्याने नेऊ लागला.
पीडितेने विरोध केला असता चुपचाप बस नाहीतर बदनामी करेल असे म्हटले. शेगावातील लॉजवर नेऊन पीडित महिलेवर बळजबरीने अत्याचार केला. नंतर खामगाव येथे आणून सोडून कुणालाही काही सांगू नको अशी धमकी दिली. दरम्यान बुलढाणा येथे देखील बऱ्याच वेळा येऊन बुलढाणा शहर संगम चौकातील जयस्वाल प्लाझमा येथे पीडित महिला सात महिन्याच्या मुलाला सोबत घेऊन गेली होती. आरोपी म्हणाला की माझ्यासोबत लग्न कर आणि मुलाला मला दे.. असे म्हणत आरोपीने पट्टयाने मारहाण केली. दरम्यान पीडित विवाहितेच्या भावाने आरोपीला फोन लावला असता भावाला सुद्धा बंदुकीने उडवून टाकीन अशी धमकी दिली. याप्रकरणी पोलीसांनी गुन्हे दाखल केले असून तपास सुरू आहे.

Previous articleमेहकर तालुक्याचे संदिप गवई ‘ठरणार अनेकांची डोकेदुखी! सामान्य कार्यकर्त्याच्या उमेदवारीची चर्चाच लय भारी !
Next articleछोट्या-मोठ्या कारणांवरून खामगावात चाकू-तलवारी चाल्या, एक गंभीर, चौघांवर गुन्हा दाखल!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.