Home बुलढाणा युवा मराठा न्यूज ब्रेकिंग माहिती अधिकार कार्यकर्ता भारत चव्हाण यांच्यावर जीवघेणा हल्ला...

युवा मराठा न्यूज ब्रेकिंग माहिती अधिकार कार्यकर्ता भारत चव्हाण यांच्यावर जीवघेणा हल्ला डोक्यात रॉड टाकले भयंकर रक्तस्त्राव

102

आशाताई बच्छाव

1000543244.jpg

युवा मराठा न्यूज ब्रेकिंग

माहिती अधिकार कार्यकर्ता भारत चव्हाण यांच्यावर जीवघेणा हल्ला
डोक्यात रॉड टाकले
भयंकर रक्तस्त्राव
बुलढाणा, 10 जुलै तोंड बांधून आलेल्या चार ते पाच जणांनी माहिती अधिकार कार्यकर्ता भारत चव्हाण यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. जिल्हा परिषदेच्या मागील गल्लीत कऱ्हाळे एका तासापूर्वी यांच्या चहाच्या हॉटेलजवळ ते बेसावध असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. खूप मोठ्या प्रमाणावर त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाल्याचे प्रत्यक्ष दर्शीनी सांगितले. रस्त्यावरही रक्त सांडले होते. यावेळी भारत चव्हाण यांच्यासोबत आणखी एक जण असल्याचे समजते. चव्हाण यांना वाचवित असताना त्यांनाही मार लागला असल्याचे बोलले जात आहे. हल्ला करून हल्लेखोर ताबडतोब फरार झाले. पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. गंभीर अवस्थेत त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते. भारत चव्हाण यांनी प्रशासनातील काही अधिकारी तसेच काही कर्मचाऱ्यांविरोधात माहितीच्या अधिकारा मधून भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढली असल्यामुळेच त्यांच्यावर कुणीतरी डाव ठेवून हल्ला केला असावा असा अंदाज त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे.

Previous articleमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नांदेड जिल्ह्यात 48 हजारावर अर्ज दाखल
Next articleमेरा बुद्रुक येथील पर्वताबाई माधवराव पडघान यांचे निधन .
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.