Home रायगड छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या रायगड किल्ल्या वरचे जाणारा रोपवे पुन्हा सुरु...

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या रायगड किल्ल्या वरचे जाणारा रोपवे पुन्हा सुरु !

17
0

आशाताई बच्छाव

1000537918.jpg

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या रायगड किल्ल्या वरचे जाणारा रोपवे पुन्हा सुरु !

 

युवा मराठा न्यूज रायगड ब्युरो चीफ :- मुजाहीद मोमीन

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर रविवारी सात जुलै रोजी झालेल्या ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटक किल्ल्यावरून आलेल्या पाण्याच्या प्रवाहात अडकल्याने व दोन दिवसात मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पायरी मार्ग 31 जुलै पर्यंत बंद ठेवला आहे तर रोपवे देखील दोन दिवसासाठी बंद करण्यात आला होता मात्र आत 11 जुलैपासून रायगड रोपवे पुन्हा चालू झाल्याचे रायगड रोपवे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

किल्ले रायगडावर सात जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे व ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह पायरी मार्गाने आल्याने व पाण्याचे धबधबे मोठ्या प्रमाणावरून किल्ल्यावर वाहत असल्याचे चित्र पाहण्यास मिळाले होते त्यामुळे किल्ले रायगडावर पायरी मार्गाने जाणाऱ्या पर्यटकांना कोणतीही दुखापत होऊ नये यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने 31 जुलै पर्यंत पायरी मार्ग बंद ठेवला आहे तर पर्यटक रोपवेने जाऊन मोठ्या प्रमाणावर किल्ल्यावर पर्जन्यवृष्टी झाली तर आपत्कालीन परिस्थिती त कोणतीही घटना घडू नये यासाठी रायगड रोपे दोन दिवसासाठी बंद ठेवण्यात आला होता मात्र 11 जुलैपासून पुन्हा रायगड रोपे चालू करण्यात आल्याचे रायगड रोपवे तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

किल्ले रायगडावर सुट्टीच्या दिवशी रविवारी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात या पर्यटकांच्या माध्यमातून किल्ले रायगड परिसरात असणाऱ्या स्थानिक बेरोजगार तरुणांना व व्यावसायिकांना त्याचा फायदा होतो जर पर्यटक बंद झाले तर रायगडावरील बेरोजगार तरुणांना उपासमारीची वेळ येऊ शकते यासाठी प्रशासनाने रायगड रायगड पाहण्यासाठी येणाऱ्या तरुणांसाठी व पर्यटकांसाठी आपत्कालीन परिस्थितीमध्ये तशी परिस्थिती उद्भवू नये व उद्भवल्यास त्यावर उपाययोजना करता याव्यात यासाठी निश्चित आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी पावसाळ्यात झाली तरच रायगड सारख्या किल्ल्याच्या माध्यमातून पर्यटक वाढून पर्यटनाला चालना मिळू शकेल.

मात्र विकासाच्या नावाखाली केवळ रस्ते व संरक्षण भिंती बांधून व राज्याभिषेक सोहळा साजरा करून पर्यटकांच्या संख्येत वाढ होणार नाही तर पर्यटन धोरणाच्या आराखड्यानुसार त्याची स्थानिकांना विश्वासात घेऊनच पर्यटन आराखडा राबविला तरच रायगड किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल व स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल त्यासाठी गरज आहे. ती समन्वयाची मात्र त्यात देखील राजकारण येत असल्याने रायगड किल्ल्यावरील पर्यटनाच्या दृष्टिकोनातूनच त्याची अंमलबजावणी व धोरण आकडे व पर्यटकांना मूलभूत सोयी सुविधा पुरवणे गरजेचे असल्याचे अनेक पर्यटकांनी सांगितले

Previous articleसोलापूरकरांच्यावतीने आस्था आरोग्य केंद्रास कॉट भेट
Next articleअमरावती महानगरपालिका आयुक्तांनी अस्वच्छतेविषयी संबंधितांना खडसावले, मनपाआयुक्त सचिन कलंत्रे.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here