Home उतर महाराष्ट्र सोलापूरकरांच्यावतीने आस्था आरोग्य केंद्रास कॉट भेट

सोलापूरकरांच्यावतीने आस्था आरोग्य केंद्रास कॉट भेट

132

आशाताई बच्छाव

1000537908.jpg

सोलापूरकरांच्यावतीने आस्था आरोग्य केंद्रास कॉट भेट

सोनई,(कारभारी गव्हाणे प्रतिनिधी): सोनई येथील पसायदान आनंदवन सेवाभावी संस्थेच्या आस्था आरोग्य केंद्रास गणेश क्लासेसचे संचालक गणेश सोलापूरकर व परिवाराने सेमी फाऊलर बेड भेट दिला आहे. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गार्डनमध्ये फुलझाडांचे वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला.
सचिव संजय गर्जे यांनी प्रास्ताविक भाषणात राबविण्यात येत असलेल्या विधायक उपक्रमांची माहिती दिली. सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब दरंदले, सुनिल काळे, मोहनराव दरंदले, रेखा व बलभीम जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी रवि ससाणे, विशाल भळगट, संदीप घोलप, अजित बडे, अमित बंग, बंडू राजहंस, महेश राजहंस, बापूसाहेब बारगळ, विलास केशव गडाख, भाऊसाहेब भुसाळ उपस्थित होते. अध्यक्ष उदय पालवे, उपाध्यक्ष विनायक दरंदले, किशोर घावटे, सच्चिदानंद कुरकटे, राजेंद्र सानप यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला.