Home भंडारा “भेल” प्रकल्पग्रस्त उपोषण मंडपास तहसिलदारांची भेट

“भेल” प्रकल्पग्रस्त उपोषण मंडपास तहसिलदारांची भेट

26
0

आशाताई बच्छाव

1000522306.jpg

“भेल” प्रकल्पग्रस्त उपोषण मंडपास तहसिलदारांची भेट

भेल महाप्रबंधकही हजर ; आता एमआयडीसी पडली मधात : तूर्तास उपोषण मागे

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)साकोली येथील भेल प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेच्या भेल गेटसमोर शुक्रवारी ०५ जूनला सुरू करण्यात आलेले उपोषणाला साकोली तहसिलदार, भेल महाप्रबंधक यांनी भेट दिली. येथे सोलर पॉवर प्लांट लवकरच सुरू करू असे आश्वासन दिल्याने तूर्तास उपोषण काही दिवसांसाठी मागे घेतले आहे. पण हा लढा निरंतर सुरू ठेऊ असा इशाराही भेल प्रकल्पग्रस्त शेतकरी समितीने दिला आहे.
“भेल कंपनी सुरू करा किंवा या जागेवर शेतकऱ्यांना शेती तरी करू द्या” या मागणीवर काही दिवसांपासून साकोली येथील मुंडीपार सडक भेल पीप परीसरात वातावरण तापले होते. यातच एका प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकऱ्याने किटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. शुक्रवारी ०५ जूनला भेल प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना यांनी थेट भेल पीप मुंडीपार सडक गेटसमोरच मंडप ठोकून उपोषणाला अखेर सुरूवात केली. यातच तहसिलदार निलेश कदम यांना यांची माहिती होताच तातडीने त्यांनी चमुंसह उपोषण मंडपाकडे धाव घेतली. याप्रसंगी भारत हेवी इलेक्ट्रीकल लिमिटेड ( भेल ) चे महाप्रबंधक जितेंद्र गणवीर यांनीही हजेरी लावली. या उपोषणकर्ते शिष्टमंडळांशी यांच्या दिर्घ चर्चेत एमआयडीसी कडे प्रकरण प्रलंबित असून न्यायालयाच्या दोन महिन्यांत निकाल लागेल व येथे भेल सोलर पॅनल प्रॉडक्शन कारखाना लवकरच सुरू करू. या प्रकाराचे लेखी आश्वासन भेल प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना समिती अध्यक्ष व सरपंच विजय नवखरे, सरपंचा मनोरमा हेमणे, डॉ. सोमदत्त करंजेकर, सचिन दुरूगकर, रामेश्वर निंबार्ते, पिंपळगाव सरपंच श्याम शिवणकर आणि जिल्हा परिषद सभापती मदन रामटेके यांनी स्विकारले. त्यानंतर भेल प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना समितीने हे सुरू केलेले उपोषण काही दिवसांसाठी मागे घेण्यात आले.
यावेळी उपोषण मंडपात उपोषणकर्ते शिष्टमंडळांनी असा पवित्रा घेतला होता की, अखेर किती दिवस ताटकळत ठेवणार आहेत. प्रशासनाने शेतकऱ्यांना जमिनी घेता वेळी त्यांच्या कुटुंबीयातील एका व्यक्तीला भेल मध्ये नोकरीवर सामावून घेऊ. पण १२ वर्षांपासून निव्वळ फोल आश्वासने देत युवा बेरोजगारांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत. जरी आम्ही हे सुरू केलेले उपोषण लेखी स्वरूपात दिलेल्या आश्वासनाने मागे घेत आहोत पण हा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा, बेरोजगारांचा लढा यापुढेही सुरूच राहणार आहे असा इशाराही देण्यात आला.

Previous articleनाशिक जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांमधील मुलींना मिळणार मोफत सायकल
Next articleनेरला गावाचे पुनर्वसन करण्यात यावे याकरिता रस्ता रोको आंदोलन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here