Home जालना अंगारकी चतुर्थी निमित्त जालना ते राजुर वाहतूक मार्गात बदल पोलीस प्रशासनाचा निर्णय.

अंगारकी चतुर्थी निमित्त जालना ते राजुर वाहतूक मार्गात बदल पोलीस प्रशासनाचा निर्णय.

54
0

आशाताई बच्छाव

1000488334.jpg

अंगारकी चतुर्थी निमित्त जालना ते राजुर वाहतूक मार्गात बदल पोलीस प्रशासनाचा निर्णय.
तालुका प्रतिनिधी जाफराबाद -मुरलीधर डहाके
दिनांक /२३/०६/२०२४
याविषयी सविस्तर वृत्त असे की, मंगळवार दिनांक २५/०६/२०२४रोजी अंगारकी चतुर्थी निमित्त पोलीस ठाणे हसनाबाद हद्दीतील मौजे राजुर तालुका भोकरदन येथे दिनांक अंगारकी चतुर्थी निमित्त श्री गणपती दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक मराठवाडा, खानदेश, विदर्भ येथून येतात. तसेच जालना शहरातून व भोकरदन, जाफराबाद भागातून मोठ्या प्रमाणात श्री पुरुष ,आबालवृद्ध लहान मुले पायी दर्शनासाठी येतात. मग तीर्थक्षेत्र स्थळास महाराष्ट्र शासनाने पर्यटन स्थळाचा दर्जा दिला असल्याने भाविकांची गर्दी राहणार आहे. त्याअर्थी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ ची कलम ३६ अन्वेय मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून मी अजय कुमार बन्सल पोलीस अधीक्षक, जालना याप्रमाणे खालील आदेश देत आहे. पोलीस ठाणे हसनाबाद हद्दीतील मौजे राजुर तालुका भोकरदन येथे दिनांक २५/०६/२०२४ रोजी अंगारकी चतुर्थी निमित्त श्री गणपती दर्शनासाठी येणारे भाविकांची गैरसोय होऊ नये तसेच अनुचित प्रकार टाळण्यासाठी वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी व वाहतुकीची कोंडी होऊ नये व कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी म्हणून या दृष्टिकोनातून राजुर तालुका भोकरदन कडे वाहनांचे वाहतुकीत अंशतः बदल करण्यात येत आहे. 1) भोकरदन चौफुली जालना येथून राजुर भोकरदन कडे जाणाऱ्या जड वाहनधारकांनी (भक्तांचे वाहने वगळून) आपली वाहने देऊळगाव राजा, जाफराबाद, माहोरा, भोकरदन मार्गाने जावे. 2) भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्यापासून राजुर जालना कडे येणाऱ्या जड वाहनधारकांनी माहोरा, जाफराबाद, देऊळगाव राजा या मार्गाने जावे. वरील मार्गाची जड वाहतूक दिनांक २४/ ०६/२०२४ रोजीचे १०.०० वाजे पासून दिनांक २६/०६/२०२४ रोजिचे ०२.०० वाजे पावेतो बदल करण्यात आलेला आहे. तरी सर्व वाहनधारकांनी याची नोंद घ्यावी. सदरचा आदेश दिनांक२४/०६/२०२४ रोजीचे १०.०० वाजे पासून दिनांक २६/०६/२०२४ रोजीचे ०२.०० वाजे पावेतो अंमलात राहील. सदरचा आदेश मी अजय कुमार बन्सल पोलीस अधीक्षक, जालना माझ्या सही शिक्या निशी दिनांक २०/०६/२०२४ रोजी जारी केला आहे.

Previous articleपैसे परत द्या अन्यथा ट्रॅक्टर द्या ; २०० च्या वर शेतकरी धडकले कंपनीवर
Next articleशाळा पूर्व तयारी भाग दोन निमित्त नवीन प्रवेशीत मुलांचा सत्कार .
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here