Home भंडारा चंद्रशेखर खोब्रागडे समाजसेवा पुरस्काराने सन्मानित

चंद्रशेखर खोब्रागडे समाजसेवा पुरस्काराने सन्मानित

63
0

आशाताई बच्छाव

1000481313.jpg

चंद्रशेखर खोब्रागडे समाजसेवा पुरस्काराने सन्मानित

 

भंडारा -कहालकर दुःखनिवारक दवाखाना भंडारा व शिवतीर्थ मानव कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था व अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेच्या वतीने 9 जून 2024 रोज रविवारला दुपारी 3 वाजता पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहार पाथरी ( चिचाळ ) येथे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस व अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा सन्मान आयोजित करण्यात आला होता.चंद्रशेखर खोब्रागडे हे लाल बहादूर शास्त्री वार्ड भंडारा येथील रहिवासी असून सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर व अनेक प्रश्नांना घेऊन त्यांच्या समस्या सोडविण्याकरिता प्रयत्न करीत असतात .त्यांच्या कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांना सन्मानपत्र पुष्पगुच्छ देऊन अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे ,महाराष्ट्र शासन समाज भूषण पुरस्कार प्राप्त पत्रकार डी जी रंगारी, पत्रकार प्रेमानंद हटवार, पत्रकार ब्रह्मदास बागडे ,सामाजिक कार्यकर्ते सदानंद धारगावे, यांच्या प्रमुख उपस्थितीत विश्राम गृह भंडारा येथे दिनांक 2o जून 2024 ला सन्मानित करण्यात आले . यावेळी स्वप्नाली उके, कीर्ती भांडारकर ,रागिनी दुबे ,नलू वानखेडे, रोशनी निखुडे रंजू जनबंधू नम्रता बागडे, मनीषा भंडारकर ,प्रीती देशमुख, माधुरी साठवणे ,यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here