आशाताई बच्छाव
आलेबेदर येथील त्रीरत्न बुद्ध विहार येथे तीन दिवसीय समता सैनिक दलाचे अधिकारी प्रशिक्षण शिबिर
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)आलेबेदर येथे तीन दिवशीय समता सैनिक दलाचे अधिकारी प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब कोचे होते तर प्रमुख अतिथी म्हणून समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष मार्गदर्शक भंते नागदीपंकर ,राष्ट्रीय अतिरिक्त महासचिव अमर दीपांकर, राष्ट्रीय प्रवक्ता इंजिनियर पी सी टेभरे, राष्ट्रीय जि ओ सी डॉ प्रदीप डोंगरे, राष्ट्रीय कमांडर गजेंद्र गजभिये, डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र शासन व सामाजिक कार्यकर्ते डी जी रंगारी इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला मान्यवरांनी समता सैनिक दल हे सामाजिक चळवळीचे व आंबेडकर चळवळीचे संरक्षण करते त्याचप्रमाणे या चळवळीच्या माध्यमातून शैक्षणिक ,सामाजिक , व सांस्कृतिक फुले शाहू आंबेडकर विचारधारा रुजविण्याचे काम करते त्याचप्रमाणे सैनिक सैनिकांमध्ये लष्करी बाणा असला पाहिजे, सैनिकांमध्ये कोणत्या प्रकारचे गुण असले पाहिजे आणि सैनिक चांगल्या सैनिक कसे तयार झाले पाहिजे याविषयी व समता सैनिक दलाची भूमिका काय याविषयी सविस्तर असं एक वर्ग घेऊन मार्गदर्शन करण्यात आले या शिबिरात संजय घोडके ,आर सी फुलक्के, राजकुमार वाहने ,सुशीला गजभिये, अजय अंबादे,स्वप्निल गणवीर, मिलिंद धारगावे ,किरण वाहाने, प्रतिभा खेडेकर, धर्मदास बनकर, अरविंद कोचे, सुरेंद्र चव्हाण, युवराज भडगे ,संघप्रिय नाग ,अरविंद नंदेश्वर , बादशहा मेश्राम,विलास नागदेवे, भीमराव टेंभुर्ण, ज्योति शहारे ,मायाताई मेश्राम , र इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते व
राकेश वालदे,राहुल मेश्राम , शुभम राऊत ,राकेश वालदे, प्रज्ञा दिरबुडे, राहुल मेश्राम गोपीचंद मेश्राम, दीपक मेश्राम यांनी परिश्रम केले
राज्यातील व बाहेरही राज्यातील 100 अधिकारी उपस्थित होते.






