आशाताई बच्छाव
सरस्वती विद्यालयात प्रवेश महोत्सव साजरा.
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करून मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप.
जिल्हा प्रतिनिधी जालना-वसंतराव देशमुख
दिनांक 15/06/2024
याविषयी सविस्तर माहिती अशी की,आज दिनांक 15/0 6 /2024 रोजी नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच विभागासह मराठवाडा विभागातील शाळा सुरू झाल्या आहेत. आज पहिल्याच दिवशी जालना जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद खाजगी व्यवस्थापनाच्या मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळा उघडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शाळेचा पहिला दिवस असल्याने सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोंदेगाव या विद्यालयातील विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन देशमुख सर यांचे हस्ते विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व मीठाई वाटप करण्यात आले.
शाळेच्या पहिल्याच दिवशी उपस्थित विद्यार्थ्यांना शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत पुस्तकांचे वाटप करण्यात आले आहे.सरस्वती विद्यालय व परिसराची स्वच्छता केली आहे. शालेय विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. विद्यालयाने विद्यार्थ्यांना पीण्याच्या पाण्याची कमतरता पडणार नाही याची काळजी घेतली आहे. यासोबतच शाळेचे सर्व
शिक्षक कर्मचा ऱ्यांची उपस्थिती दिसून आली. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्य पुस्तकांचे वाटप करण्यात कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये या उद्देशाने विद्यालयात शासनाच्या शिक्षण विभागामार्फत मीळणारे मोफत पुस्तके याअगोदरच उपलब्ध करण्यात आलेले आहेत.
विशेष म्हणजे सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पहिल्याच दिवशी शालेय पोषण आहार तयार करून वाटप करण्यात आले. यामध्ये नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाल्याच्या निमित्ताने शालेय पोषण आहारामध्ये नवीन काय म्हणून उच्चतम प्रतिच्या मीठाईचे वाटप करण्यात आले आहे.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सचिन देशमुख सर, श्री जी.एन.जाधव, श्री पी.बी. बांडगे, श्री व्ही. एस. दळवी, श्री के. व्ही. नवल, श्री आर .आर. वायाळ, श्री एस ए आमले श्री डी ए वाघ श्री व्ही टी बोर्ड श्री एस एम शेळके श्री आर.ए. साबळे, श्री एस.डी.दांडगे, श्री व्ही.पी.देशमुख, श्री एन.बी.कनखर, श्री एस.ए.दांडगे, श्रीमती रंजना देशमुख, श्रीमती शितल मगर, श्री ए.एम.कोहीरे, श्री एस.पी.शिंदे, श्री जी.एन.डोंगरे, श्री पी.जी.पाटील, श्री नरेंद्र शिंदे, श्री शिवाजी मुळे, श्री एल.जी.वाघ, श्री भारत गळगुंडे, श्री एस.जी.पवार यांच्यासह सर्व शिक्षक कर्मचारी हजर होते.