Yuva maratha news
नाशिक प्रतिनिधी तौफिक अत्तार
आपले युवा मराठा वार्ताहर इम्तियाज अत्तार यांच्या एका फोनवर झाले भुयारी गटाराची स्वच्छता आणि नवीन पाईप लाईन ची व्यवस्था.
शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संघटना चे संचालक तथा महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख इम्तियाज अत्तार यांना चंदनवाडी पडोळ चाळ येथील नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या प्रभाग क्रमांक २१ येथील भुयारी गटार वारंवार चोकप होत असल्याने तेथील नागरिक फार त्रस्त झाले होते नागरिकांनी युवा वार्ताहर इम्तियाज अत्तार यांना कळविले की यामुळे डासांची प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढला आहे दुर्गंधी पसरली आहे याची दखल घेत इम्तियाज अत्तार यांनी महानगरपालिकेचे पालवे साहेब आणि लोणे साहेब यांना संपर्क साधुन नवीन पाईप लाईन करण्यासाठी साहेबांची भेट घेत त्यांनी या गोष्टीची दखल घेत कामाला सुरुवात केली
यावेळी शिवतेज संघटनेचे नाशिक शहर अध्यक्ष सुनिल भोसले आणि भगुर देवळाली कॅम्प शहराध्यक्ष सुदर्शन बर्वे उपस्थित होते.