Home जालना ठकाजी वीर यांचा सेवानिवृत्ती बद्दल सत्कार  

ठकाजी वीर यांचा सेवानिवृत्ती बद्दल सत्कार  

131

आशाताई बच्छाव

1000423655.jpg

ठकाजी वीर यांचा सेवानिवृत्ती बद्दल सत्कार
जालना/दिलीप बोंडे ब्युरो चीफ 
येथील जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी ठकाजी वीर हे ३९ वर्षांच्या सेवेनंतर शुक्रवारी  सेवानिवृत्त झाले. याबद्दल त्यांचा महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोमल कोरे, नारायण कावळे, लहाने, खडके, गळधर, रवी कोरूडे, संभेराव, श्रीमती धनवड, श्रीमती मीना घुले आदींची उपस्थिती होती. या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोमल कोरे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी ठकाजी वीर यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. ठकाजी वीर यांनी १९८५ साली  राजूर येथील आरोग्य केंद्रावर शिपाई म्हणून सुरूवात केली.  त्यानंतर अंबड आणि जालना जिल्हा परिषदेत शिपाई म्हणून काम केले. यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचा  शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

Previous articleआता तरी सुधरा रे…. यावर्षी संपूर्ण देशात भीषण पाणीटंचाई!
Next articleअखिल भारतीय जैन सोशल ग्रुप फेडरेशन च्या राष्ट्रीय वरिष्ठ  उपाध्यक्षपदी श्री गौतमसिंग मुणोत व डॉ.सोनाली मुनोत या दांपत्याची फेर निवड
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.