Home अमरावती विद्युत तार अंगावर पडून आठ गाईंचा मृत्यू दोषीवर कारवाई करून नुकसान भरपाई...

विद्युत तार अंगावर पडून आठ गाईंचा मृत्यू दोषीवर कारवाई करून नुकसान भरपाई द्या – सुनील खराटे.

69
0

आशाताई बच्छाव

1000414935.jpg

विद्युत तार अंगावर पडून आठ गाईंचा मृत्यू
दोषीवर कारवाई करून नुकसान भरपाई द्या – सुनील खराटे.
_____________
दैनिक युवा मराठा.
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.

विद्युत पुरवठा करणाऱ्या मुख्य लाईनची जिवंत विद्युत तार अंगावर पडून शेतात
चरणाऱ्या आठ गाईंचा घटनास्थळीच तडफडून मृत्यू झाल्याची घटना भातकुली तालुक्यातील हरताळा या गावी गुरुवारी सकाळी घडली .सदर घटनेची माहिती मिळताच शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी घटनास्थळी भेट देत या घटनेप्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करून पशुपालक शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.
हरताळा येथील काही जनावरे गावाशेजारील शेतात चरत असताना अचानक त्यांच्या अंगावर मुख्य विद्युत वाहिनीची तार पडली. या घटनेत गावातील गरीब पशुपालक शेतकरी दीपक सणके ,विजय देशमुख दिलीप दुर्गे ,गजानन राऊत ,राजीव उघडे, जीवन वाहकार ,जगन धनघोडे यांच्या मालकीच्या आठ गाईंचा विद्युत शॉक लागून तडफडून जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत रोष व्यक्त केला. दरम्यान शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी तत्काळ घटनास्थळाला भेट देत पाहणी करीत विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता महावितरणचे अधिकारी, पशु विभागाचे अधिकारी, तहसीलदार ,तलाठी ,पोलीस अधिकारी अवघ्या काही वेळात घटनास्थळी दाखल होत त्यांनी पंचनामा केला. दुभत्या गाईंचा मृत्यू झाल्यामुळे गरीब पशुपालक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून संबंधित विभागाने पंचनामा करीत सर्व शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी तसेच या घटनेप्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी जिल्हाधिकारी व संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे. याप्रसंगी शिवसैनिक शिवाजी देशमुख, शाखाप्रमुख प्रदीप सनके ,संदीप वानखडे ,संजय दुर्गे अनिल दुर्गे ,अश्विन दुर्गे ,विनोद दुर्गे ,प्रवीण राऊत, प्रमोद राऊत, गोलू वानखडे, कैलास वानखडे ,प्रकाश मदने ,विजय देशमुख, दिवाकर वानखडे, राजेंद्र सनके गुरुदास दुर्गे ,शरद दुर्गे ,सतीश वानखडे, दिलीप दुर्गे, सुनील वानखडे, घोडेश्वर पवार, सुभाष राऊत ,महादेव गवई आदी उपस्थित होते .
@@@@
मोठा अनर्थ टळला
हरताळा येथील ज्या शेतात ही घटना घडली त्या ठिकाणी काही शेतमजूर महिला काम करीत होत्या. जिवंत विद्युत तार शेतात चरणाऱ्या जनावरांच्या अंगावर पडतात त्या महिलांनी स्वतःला सावरत सतर्क झाल्या, परिणामी मोठा अनर्थ टळला.

Previous articleनांदुर्डी विद्यालयात प्रज्ञा निफाडे प्रथम– विद्यालयाचा शेकडा निकाल ९३.८४%
Next articleमालवाहू ऑटो उलटला; १६ जखमी: पैसे कमविण्याच्या प्रयत्नात झाला अपघात.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here