आशाताई बच्छाव
मालवाहू ऑटो उलटला; १६ जखमी: पैसे कमविण्याच्या प्रयत्नात झाला अपघात.
दैनिक युवा मराठा.
पी.एन.देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
अमरावती जिल्ह्यातील शिरसगाव मोझरी येथून कामावर मजूर घेऊन जाणारा मालवाहू येतो मोदीच्या वरून रस्त्यावर पलटी झाला. त्यात या ऑटोतील १९ पैकी १५ ते १६ मजूर जखमी झाले. सकाळी नऊ वाजता च्या दरम्यान घटना घडली. घटनेच्या वेळी मालवाहू ऑटो एमएच २७/आर ५८१५ शिरजगाव मोझरी येथून लग्न सोहळ्यातील केटरिंग च्या कामावरील १९ मजूर घेऊन तळेगाव ठाकूर येथे घेऊन जात होता. दरम्यान मुजरीच्या वळण रस्त्यावर अचानक चारकाचे संतुलन बिघडले व भारत धाव ऑटो वळण रस्त्यावरून महामार्गाच्या कडेला जाऊन पलटी खाल्ली. त्यात सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी, मालवाहू ऑटो मधील शिरजगाव मोझरी येथील१५ते१६ जन जखमी झाले आहे. जखमी मध्ये आयुष पुरी, सुदर्शन बेहरे, हर्षल भोंगाडे, भावेश पाच घरे, प्रज्वल घाठोड, आर एन खेडकर, तेजस तिखे, मयूर मेश्राम, आश्विन उईके यांच्यासह एकूण १५ ते १६ जखमी झाले. जखमींना प्रथम उपचार अर्थ गुरुकुनी मोझरी येथील श्री गुरुदेव आयुर्वेद रुग्णालयात उपचार करताना व नंतर अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णांना दाखल करण्यात आले. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत अशावेळी घरात बसून राहण्यापेक्षा काम केल्याने हातात दोन पैसे येतील या उद्देशाने शिरसगाव मोझरी येथील बहुतेक तरुण हे केटरिंगच्या कामासाठी जातात. दरम्यान तळेगाव येथे लग्नकार्य असल्याने, जखमी मजूर हे कटिंगच्या कामासाठी जात होते. मात्र, असे कमाविण्याच्या नादात त्यांना अपघाताचा सामना करावा लागला.