आशाताई बच्छाव
सावित्रीबाई माध्यमिक विद्यालयाची यशाची परंपरा कायम
कु. मुडे दिपाली प्रथम तर जिया वाघमारे द्वितीय
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
नांदेड –देगलूर शहरातील नामांकित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय देगलूर,या विद्यालयाचा निकाल दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी उल्लेखनीय लागल्याने दहावीच्या परीक्षेत पुन्हा सावित्रीबाई फुले विद्यालयाने यशाची परंपरा कायम ठेवली.
सदरिल विद्यालयात सेमी व मराठी असे दोन वर्ग चालतात शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये दोन्ही वर्गातुन एकूण 74 विद्यार्थी परिक्षेस बसलेले होते. त्यापैकी 68 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये विशेष प्राविण्य मिळवणारे 21 विद्यार्थी तर प्रथम श्रेणीतील 21 आणि व्दितीय श्रेणीमध्ये 17 विद्यार्थी व पास विद्यार्थी 03 यशस्वी झाले.या यशाबद्दल लोकहित शिक्षण संस्थेचे,अध्यक्ष श्री राजाराम कहाळेकर ,संस्थेचे सचिव अँड.जयवंत गजभारे , माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री यशवंत गजभारे , प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री किशन पाटील तसेच शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे तसेच दहावीच्या श्रीमती काळे एस बी व श्री पवार व्ही.पी या दोन वर्गाच्या वर्ग शिक्षक तसेच सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले त्याबद्दल स संस्थेकडून अभिनंदन करण्यात आले.






