Home अमरावती महाराष्ट्राला मिळाले नवे१२ आय ए एस, अमरावती येथे अमर राऊत, तर गडचिरोलीत...

महाराष्ट्राला मिळाले नवे१२ आय ए एस, अमरावती येथे अमर राऊत, तर गडचिरोलीत सिद्धार्थ शुक्ला यांची प्रशिक्षणार्थ म्हणून वर्णी.

72
0

आशाताई बच्छाव

IMG_20240323_065135.jpg

महाराष्ट्राला मिळाले नवे१२ आय ए एस, अमरावती येथे अमर राऊत, तर गडचिरोलीत सिद्धार्थ शुक्ला यांची प्रशिक्षणार्थ म्हणून वर्णी.
—–_——
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
सन-२०२३च्या तुकडेतील परीरिक्षाधिन भारतीय प्रशासन सेवेमध्ये १२ अधिकाऱ्यांचे मसूरी येथील लालबहादूर शास्त्री प्रशासकीय अकादमी इथून फेज-१चे प्रशिक्षण ५ एप्रिल २०२४ रोजी संपुष्टात येत आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या अधिकाऱ्यांना पुढील प्रशिक्षणासाठी राज्य शासनाकडे रुजू होणार आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्राला नवे १२ आय ए एस अधिकारी मिळाले असून जिल्हा प्रशिक्षणासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून त्यांची पदस्थापना करण्यात महसूल व वन विभागाने १८ मार्च २०२४ रोजी निर्गमित केला आहे. यात सिद्धार्थ शुक्ला (गडचिरोली) लघिमा तिवारी (यवतमाळ), अनुष्का शर्मा (नांदेड),जी.व्हि.एसपवनदत्त(नंदुरबार), कश्मीरा संख्ये (चंद्रपूर),बी. सरवनन(धुळे), आप्रिताठुबे(बीड), अमर राऊत (अमरावती) वेवोतोल केझा(जळगाव),रेवैयाह डोंगरे(वर्धा), अरुण (जालना), पूजा खेडकर (पुणे) या प्रशिक्षणार्थांची जिल्हा निहाय सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून पदस्थापना करण्यात आहे.३१ जुलै२०२३ते३० जुलाई २०२५ असा परिविक्षाधीन कालावधी असेल, असे आदेश राज्य महसूल व वन विभागाचे सहसचिव श्रीराम यादव यांनी आदेशाद्वारे जारी केले आहे.

Previous articleनाशिकरोडला “द बर्निग ट्रेनची” घटना
Next articleनाशिकरोडला युवा मराठा महासंघाचे शिबिर संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here