Home जालना केंद्रीय मंत्री ना. रावसाहेब पाटील दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा बूथ पदाधिकारी मेळावा...

केंद्रीय मंत्री ना. रावसाहेब पाटील दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा बूथ पदाधिकारी मेळावा संपन्न

84

आशाताई बच्छाव

IMG_20240322_093455.jpg

 

केंद्रीय मंत्री ना. रावसाहेब पाटील दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली

भाजपा बूथ पदाधिकारी मेळावा संपन्न

जालना (प्रतिनिधी दिलीप बोंडे) केंद्रीय मंत्री ना. रावसाहेब पाटील दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी बूथ मेळावा कार्यक्रम साई लॉन्स, राममूर्ती येथे आज दि. २१ मार्च २०२४ रोजी घेण्यात आला.

यावेळी ना. दानवे म्हणाले की, देशाच्या पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी विराजमान झाल्यानंतर देशाच्या आणि राज्याच्या विकासासाठी अनेक चांगल्या योजना व विकासाची मोठी गती वाढली आहे, त्यामुळे देशाला पुन्हां पंतप्रधान पदी विराजमान करायचे असेल तर गाव पातळीवर बूथ संघटन मजबूत करा, आपले संघटन जर मजबूत असेल तर भाजपाला कोणीही हरवू शकत नाही. त्यामुळे भाजपा पदाधिकारी आणि बुथ प्रमुखांनी केंद्र व राज्य सरकारच्या जन कल्याणकारी योजना ग्रामीण भागातील सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करून संघटन मजबूत करावे असे ही बूथ प्रमुखांच्या मेळाव्यात ना.दानवे यांनी बोलताना सांगितले.

यावेळी आ.नारायण कुचे, राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण, रिपाई पक्षाचे ब्रम्हानंद चव्हाण, जिल्हाध्यक्ष मा. बद्रीनाथ पठाडे, विधानसभा प्रमुख भास्कर (आबा) दानवे, राजेश राऊत, रामेश्वर भांदरगे, अर्जुन गेही, सिद्धिविनायकजी मुळे, भागवत बापू बावणे, वसंतराव शिंदे यांच्यासह जालना तालुका जिल्हा पदाधिकरी, माजी जि.प.व पं.स सदस्य.,तालुका पदाधिकारी,शक्तीकेंद्र प्रमुख,सुपर वॉरीयर्स,बुथ प्रमुख व बुथ समिती,पेज प्रमुख समिती सर्व मोर्चा व आघाडीचे पदाधिकारी यांनी मेळाव्यास विविध पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

 

Previous articleसुनील थोरात पंचाळे ग्रा पं च्या उपसरपंचपदी बिनविरोध
Next articleविदेशी दारू वाहतूक करणारा इसम, 4,18,160 रुपयांच्या मुद्देमालासह जेरबंद .
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.