Home बीड शिवतीर्थावरील अतिषबाजीने वेधले लक्ष; आज सुप्रसिद्ध मराठी रॅपर मिटोराईड येणार

शिवतीर्थावरील अतिषबाजीने वेधले लक्ष; आज सुप्रसिद्ध मराठी रॅपर मिटोराईड येणार

18
0

आशाताई बच्छाव

IMG_20240220_074141.jpg

शिवतीर्थावरील अतिषबाजीने वेधले लक्ष; आज सुप्रसिद्ध मराठी रॅपर मिटोराईड येणार

मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा

बीड दि:१९  आज बीड येथील छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त माजी नगराध्यक्ष डॉ.दीपाताई शिरसागर, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर, कल्पतरूच्या सचिव डॉ. सारिकाताई क्षीरसागर यांनी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. दरम्यान शिवजन्मउत्सवाचे स्वागत करत शिवतीर्थावर मध्यरात्री करण्यात आलेल्या अतिश बाजीने बीडकरांचे लक्ष वेधले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजयंती निमित्त सर्व शिवप्रेमी भगवे फेटे बांधून एकत्र आले. पुतळ्याच्या परिसरात ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. तसेच पारंपारिक ढोल, ताशे, तुतारींच्या गगनभेदी गर्जना, जिजाऊंच्या आणि शिवरायांच्या जय जय काराच्या घोषणेने परिसर दणाणून गेला होता. जयंतीनिमित्त शेकडो भक्त पारंपारिक पोशाखात मिरवणुकीत सहभागी झाले होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. योगेश क्षीरसागर यांनी शिवजयंतीनिमित्त सर्व शिवप्रेमींना शुभेच्छा दिल्या. तसेच आज सायंकाळी ०७ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर लाईट, साऊंड शो होणार असून सुप्रसिद्ध मराठी रॅपर मिटोराईट येत आहेत. या सोहळ्याचे बीडकरांनी साक्षीदार व्हावे असे आवाहन डॉ. योगेश शिरसागर यांनी केले आहे. स्वराज्य सप्ताह अंतर्गत छत्रपती शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ (शिवतीर्थ) बाल रूपातील शिवराय वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक लहान लहान स्पर्धकांनी बाल शिवरायांची वेशभूषा केलेल्या पहावयास मिळाल्या. यावेळी शिवप्रेमींना साक्षात बाल शिवराय बीडच्या शिवतीर्थावर अवतरल्यासारखे चित्र होते.

Previous articleकामरगावच्या अब्दुल फारुकने पटकावली ‘लहुश्रीजी’ विजेता ट्रॉफी
Next articleशिवगंगा हाईट सहकारी रचना संस्थेमध्ये प्रशासकाचा दोन लाख तीस हजाराचा गैरव्यवहार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here