Home वाशिम तब्बल अडीच हजार विद्यार्थ्यांनी दिली शिव सामान्य ज्ञान परीक्षा

तब्बल अडीच हजार विद्यार्थ्यांनी दिली शिव सामान्य ज्ञान परीक्षा

49
0

आशाताई बच्छाव

IMG_20240220_072432.jpg

तब्बल अडीच हजार विद्यार्थ्यांनी दिली शिव सामान्य ज्ञान परीक्षा

छत्रपती महोत्सव समितीद्वारा आयोजन,शिवजयंतीला होणार बक्षीसाचे वितरण..

गोपाल तिवारी ब्युरो चीफ। वाशिम

वाशिम तालुक्यतील साखरा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून छत्रपती महोत्सव समितीच्या वतीने सोमवार ,दि. १9 फेब्रुवारी सकाळी 9 वाजता भारतरत्न अटल बिहारी बाजपेई अंतरराष्ट्रीय जिल्ला परिषद प्राथ .शाला साखरा येथे शिव सामान्य ज्ञान परीक्षा पार पडली. दोन गटात पार पडलेल्या परीक्षेत वाशिम तालुक्यतिल अडिच हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.

परीक्षेच्या सुरवातीला जिजाऊ वंदना घेवून राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी साखरा गावचे सरपंच पांडुरंग राउत, उप सरपंच केशव ठाकरे, शाला व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजू महाले व उपाध्यक्ष सुखदेव राउत व सर्व शिक्षक व संयोजक ऋषिकेश भास्कर ठाकरे व गावातिल सर्व नागरिक उपस्थित होते. यावेळी अ गट व ब गटात शिव सामान्य ज्ञान परीक्षा पार पडली. यामध्ये पहिल्या गटात इयत्ता १ ते 5 व दुसऱ्या गटात इयत्ता 6 ते 8 पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेचा सराव व्हावा या उद्देशाने सामान्य ज्ञान परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या शिव सामान्य ज्ञान परीक्षेत जवळपास आडिच हजार विद्यार्थ्यांनि नाव नोंदविल्याचे स्पर्धा परीक्षा प्रकल्प प्रमुख मुख्याध्यापक अंबादास करे सरानी सांगीतले.

 

 

शिवजयंतीला झाले बक्षीसाचे वितरण

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून साखरा या गावत छत्रपती महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.त्या अनुषंगाने पार पाडलेल्या शिव सामान्य ज्ञान परीक्षेत जवळपास अडीच हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या परीक्षेतील विजयी स्पर्धकांना 21 फेब्रुवारी रोजी भारतरत्न अटल बिहारी बाजपेई अंतरराष्ट्रीय जिला परिषद प्राथमिक शाला साखरा येथे पारितोषिक, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्देऊन गौरविण्यात येणार आहे. सहभागी स्पर्धकांना खाऊचे वाटप करण्यात आले.

Previous articleनाशिक टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव संपन्न–
Next articleकामरगावच्या अब्दुल फारुकने पटकावली ‘लहुश्रीजी’ विजेता ट्रॉफी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here