Home उतर महाराष्ट्र लेविन भोसले यांनी केलेल्या सन्मानामुळे भारावून गेलो-बिशप अंम्ब्रोज रिबोलो

लेविन भोसले यांनी केलेल्या सन्मानामुळे भारावून गेलो-बिशप अंम्ब्रोज रिबोलो

65

आशाताई बच्छाव

IMG_20240220_065826.jpg

लेविन भोसले यांनी केलेल्या सन्मानामुळे भारावून गेलो-बिशप अंम्ब्रोज रिबोलो
श्रीरामपूर(वार्ताहर दिपक कदम) परमेश्वर आपल्या सतकृत्याला सदैव आशीर्वाद देत असतो. प्रभू येशू सर्वांवर दया करतो, मानवतेची सेवा करणाऱ्यावर कृपा करतो. अशाच विचारावर श्रद्धा ठेवणारे, मनोभावे करणारे कार्य करणारे लेविन भोसले यांनी केलेल्या सन्मानामुळे मी भारावून गेलो, असे भावपूर्ण उदगार छत्रपती संभाजीनगर येथील बिशप अंम्ब्रोज रिबेलो यांनी व्यक्त केले.
येथील प्रकाश किरण प्रतिष्ठानतर्फे बिशप अंम्ब्रोज रिबेलो यांचा सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ, शाल देऊन त्यांच्या अपूर्व धर्मकार्य व समाजसेवेचा आदर्श ठेवून अमृत महोत्सवी जीवन वाटचाल करणारे बिशप रिबेलो यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या हस्ते लेविन भोसले लिखित’ दया,क्षमा,शांती’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले त्याप्रसंगी बिशप अंम्ब्रोज रिबेलो बोलत होते. प्रारंभी लेविन भोसले यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. पुस्तकाचे महत्व सांगितले. प्रकाश किरण प्रकाश प्रतिष्ठानने १६ वर्षापासून केलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. किरण भोसले यांनी मानपत्र वाचन केले. यावेळी हरेगाव भूमिपूत्र फादर क्षीरसागर, फादर मार्कस रुपटक्के इग्नाथी, फादर जॉन दिवे उपस्थित होते. फादरांनी लेविन भोसले यांचे कार्य आणि शैक्षणिक सेवेबद्दल गौरवोद्गार काढले. लेविन भोसलेसर हरेगाव येथे संत तेरेजा बॉईज हायस्कूलमध्ये विज्ञान शिक्षक होते. त्यांनी शाळेत नवनवीन उपक्रम राबविले. ते विद्यार्थीप्रिय शिक्षक असल्याने सेवानि वतीनंतरही त्यांना विद्यार्थी भेटतात, मार्गदर्शन घेतात. सौ.विजयाताई भोसले, किरण भोसले, आकाश भोसले यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. बिशप अंम्ब्रोज रिबेलो यांनी’ दया, क्षमा,शांती’ या पुस्तकाच्या निर्मिती विषयी कौतुक केले. लेविन भोसले हे सेवाभावी लेखक आहेत. ते कधीच स्वस्थ बसलेले मी पाहिले नाहीत, ते विविध सामाजिक कार्यात सतत कार्यरत, सहभागी राहतात.त्यांच्या कार्याचा मला सार्थ अभिमान वाटतो. त्यांच्या साहित्य,शिक्षण, धर्माच्या आदर्श कार्याचा वसा आणि वारसा आजच्या तरुणांनी जपला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. सौ. विजयाताई भोसले यांनी आभार मानले.

Previous articleपितृ छाया प्रतिष्ठान पढेंगाव आयोजित जिल्हा स्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार, वितरण सोहळा संपन्न.
Next articleआपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.