Home नांदेड युवकांचा ध्यास ग्राम – शहर विकास-विशेष युवक शिबिराचे समारोप संपन्न.

युवकांचा ध्यास ग्राम – शहर विकास-विशेष युवक शिबिराचे समारोप संपन्न.

14
0

आशाताई बच्छाव

IMG_20240209_172249.jpg

युवकांचा ध्यास ग्राम – शहर विकास-विशेष युवक शिबिराचे समारोप संपन्न.

देगलूर तालुका प्रतिनिधी, (गजानन शिंदे)

देगलूर: अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालय देगलूर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘युवकांचा ध्यास ग्राम – शहर विकास’ विशेष युवक शिबिर मौजे रामपूर येथे दि.३१/०१/२०२४ ते ०६/०२/२०२४ दरम्यान आयोजित करण्यात आले. या शिबिराचे समारोप दि.६/०२/२०२४ रोजी संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.उत्तम कुमार कांबळे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून स्वप्निल घोंगडे सहाय्यक पोलीस निरीक्षक देगलूर पोलीस स्टेशन देगलूर, राजेंद्र वाघ संचालक राष्ट्रीय सेवा योजना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक , रवी मुंडे पोलीस उपनिरीक्षक देगलूर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगे महाराज आणि महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. एनएसएस गीतानंतर पाहुण्यांचे स्वागत समारंभ पार पडला.कार्यक्रमाधिकारी प्रा. विनोद काळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. रा. से. यो. स्वयमंसेवकांनी शिबीर मध्ये आलेले अनुभव सांगताना एनएसएसमुळे स्वावलंबी, स्वच्छता विषयक जागरूक आणि एक सामाजिक बांधिलकी जपणारे नवयुवक होऊ असे विचार व्यक्त केले.आपल्या भाषणामध्ये एपीआय घोंगडे यांनी विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये कठीण परिश्रम घेऊन यशस्वी व्हावे असे आवाहन केले. प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले रवींद्र वाघ यांनी राष्ट्रीय सेवा योजना हे सर्वांगीण विकासाकरिता अतिशय उपयुक्त ठरते असे मार्गदर्शन केले. शेवटी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.उत्तमकुमार कांबळे यांनी अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचा युवक राष्ट्राच्या विकासा करीता नेहमी तत्पर असला पाहिजे असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.व्यंकट खंदकुरे यांनी केले तर आभार प्रा.गणेश क्यादरे यांनी मानले. या उद्घाटन कार्यक्रमास गावचे सरपंच सौ.स्नेहा पांडवे, जि.प.प्रा. शाळेचे मुख्याध्यापक श्री सत्यविजय हसनाळे, कार्यक्रमाधिकारी डॉ.संतोष येरावार, प्रा.संतोष वानोळे, डॉ .सर्जेराव रणखांब, डॉ. सुदाम लक्ष्मण, डॉ.विट्टल जंबाले, डॉ. रत्नाकर लक्षटे,डॉ.माधव चोले, डॉ.राजेश्वर दुडूकनाळे, डॉ.बालाजी कत्तुरवार, डॉ. संजय देबडे, डॉ.विनय भोगले,डॉ. भानुदास नरवाडे, डॉ.पोकलवार राजकुमार, डॉ. निरज उपलंचवार, डॉ.सुरेश काशिदे, प्रा. साई आकाश रोटे प्राध्यापिका सौ.देबडवार मॅडम, प्राध्यापिका अस्फिया नाज मॅडम, प्राध्यापिका पाटिल मॅडम, प्रा. गुरुडे शिवचरण,प्रा.रत्नाकर चिद्रावार, प्रा. बाळासाहेब नागरगोजे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ महाविद्यालयातील प्राध्यापक व स्वयंसेवक-स्वयंसेविका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Previous articleयुवकांचा ध्यास ग्राम – शहर विकास-विशेष युवक शिबिराचे समारोप संपन्न.
Next articleयुवकांचा ध्यास ग्राम – शहर विकास-विशेष युवक शिबिराचे समारोप संपन्न.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here