Home नाशिक राज्यस्तरीय समरसता साहित्य संमेलनात प्रा. हेमंत चोपडे परिसंवादक     

राज्यस्तरीय समरसता साहित्य संमेलनात प्रा. हेमंत चोपडे परिसंवादक     

107

आशाताई बच्छाव

IMG-20220625-WA0036.jpg

राज्यस्तरीय समरसता साहित्य संमेलनात प्रा. हेमंत चोपडे परिसंवादक                                             नाशिक,(दिलीप चव्हाण ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

दि. 2 व 3 जुलै नागपूर येथे होऊ असलेल्या १९ व्या राज्यस्तरीय समरसता साहित्य संमेलनात साहित्यीक वक्ते प्राचार्य श्री हेमंत चोपडे परिसंवादात सहभागी होत आहेत.
‘ शाहीर , साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य व समरसता ‘ या विषयाला वाहिलेल्या या संमेलनात ‘अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील प्रादेशिकता’ या विषयावर प्रा. चोपडे प्रकाश टाकणार आहे.
‘ सावरकर ,आंबेडकर एक समांतर प्रवास ‘ , ‘ भारत रत्नांच्या देशा ‘ आणि काही कविता संग्रह असे राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त दर्जेदार साहित्य देणारे प्रा. हेमंत चोपडे संमेलनातील परिसंवादात आपले स्वचिंतनासह, अभ्यासपूर्ण मत मांडणार आहेत.
सोबतच नाशिकचे डॉ.भास्कर म्हरसाळे, डॉ. अरुण ठोके आपले विचार मांडणार आहे,तर प्रशांत केंदळे व राजेंद्र उगले कवींचा कट्टा गाजवणार आहेत. समरसता साहित्य परिषद महाराष्ट्र चे सदस्य व नाशिककर श्री गजानन होडे, आदरणीय नाना बच्छाव व श्री दिलीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली, नागपूरला सहभागी होणार्‍या नाशिकच्या संघाची धुरा सांभाळत आहेत.
दोन दिवस चालणाऱ्या या समरसता साहित्य संमेलनामध्ये संपुर्ण महाराष्ट्रातील साहित्यिक व लेखक हे अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य व जीवनावर आपआपल्या परिसंवादातून,कवितेतून वर्तमानातील अण्णाभाऊ साठे यांची विचारधारा व त्याचे उपयोगीत्व सादर करणार आहेत.

Previous articleराज्यस्तरीय समरसता साहित्य संमेलनात प्रा. हेमंत चोपडे परिसंवादक     
Next articleकृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक     
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.