आशाताई बच्छाव
लैलेशा भुरे यांना राज्यस्तरीय काव्यगौरव पुरस्कार. नागपूर,(मोहन देशमुख ब्युरो चीफ)
संघर्ष बहुउद्देशिय संस्था नागपूर द्वारा अखिल भारतीय कर्मयोगी संत गाडगेबाबा साहित्य व कला मंचच्या वतीने प्रथम वर्धापन दिन व राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वेणा नदीच्या काठावर असलेल्या विश्वशांती वेणावन शांती विहार, हिंगणा येथे २०२४ चा ” राज्यस्तरीय काव्यगौरव पुरस्कार” नागपूर येथील लेखिका व कवयित्री लैलेशा भुरे यांना देण्यात आला. राष्ट्रीय युवा प्रबोधनकार श्री.सतिश सोमकुवर,माणिकजी खोब्रागडे,गझलकारा प्रा.सुजाता मेश्राम यांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.आजपर्यंत त्यांचे अनेक लेख,कथा, कविता वेगवेगळ्या वर्तमानपत्रात छापून आलेल्या आहेत.त्यांना नृत्य,गायन, चित्रकला यांचीही आवड आहे.आजपर्यंत त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.त्यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या मासिकात, त्रैमासिकात, दिवाळी अंकात लिखाण केले आहे.या पुरस्कारासाठी त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे आहे.