
आशाताई बच्छाव
सटाणा,(जगदिश बधान प्रतिनिधी )– आखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघातर्फे 26 जानेवारीला ‘हिंदवी स्वराज्या’चं 350 वर्ष अनोख्या पद्धतीने साजरे केले गेले, या अभिनव उपक्रमामध्ये हिंदवी स्वराज्यातील ३५० किल्ल्यांवर सर्व शिवप्रेमी सर्व गिर्यारोहक यांनी एकाच दिवशी एकाच वेळी भारताचा तिरंगा ध्वज व हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज ३५० किल्ल्यावर फडकविण्यात आला.
बागलान भागातील किल्ले पिसोळ येथे राज्यकर विभागाचे GST मालेगाव अजय लिटे किल्ला प्रमुख व श्री. प्रवीण सातारकर, राज्यकर निरीक्षक, GST मालेगाव तसेच शिवनिष्ठा फाउंडेशन नांदीन गावचे अमित पवार व व त्यांचे सहकारी यांचा सहभाग अतिशय उत्साहवर्धक होता. सर्वांच्या सक्रिय सहभागामुळे हा उपक्रम अतिशय उत्कृष्टपणे पार पडला. या उपक्रमात भारताचा तिरंगी ध्वज व हिंदवी स्वराज्याचा भगवा फडकविण्यात आला तसेच शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले व गडकोटांची निगा राखणेबाबत शिवप्रतिज्ञा घेण्यात आली.