Home पुणे पुणे महानगरपालिकेचा गलथान कारभार पुन्हा उघड. 

पुणे महानगरपालिकेचा गलथान कारभार पुन्हा उघड. 

420
0

आशाताई बच्छाव

IMG_20240112_105121.jpg

पुणे,(प्रतिनिधी धनराज खांदवे)-महानगरपालिकेचा गलथान कारभार पुन्हा उघड.  लोहगाव डी.वाय.पाटील रोड वर सध्या ड्रेनेज पाईप लाईन टाकायचे काम चालू आहे. दररोज या रोड ने हजारो वाहने ये जा करतात. काम चालू असताना काही दुर्घटना होऊ नये म्हणून लोहगाव शिवसेना : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वारंवार सूचना केल्या. संबंधित ठेकेदार असो किंवा कामगार असो वेळोवेळी त्यांची कान उघडणी केली. पुणे महानगर पालिकेचे कंत्राटदार व कामगार लोकांची विनंती वेळेवर कधीच ऐकत नाहीत हे पुन्हा सिद्ध झाले. तुम्ही काम करत असलेल्या ठिकाणी सूचना फलक किंवा बरिकेट्स लावा अशी विनंती वाजा इशारा काल सकाळी (30/12/23) शिवसेना : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रभाग प्रमुख संजय मोझे व शाखा प्रमुख निखिल खांदवे व युवासेना उपविभाग अधिकारी श्रीकांत खांदवे यांनी या ठिकाणी जाऊन कामगारांना व कंत्राटदारांना दिला. व आज (31/12/23) सकाळीच हा प्रकार घडला. शाळेची व्हॅन रस्त्याच्या बाजूला खोदकाम करून ठेवलेल्या खड्ड्यात पडली. या ठिकाणी खड्याच्या बाजूने कोणत्याही प्रकारचे बरिकेट्स लावलेले न्हवते. किंवा कोणताही सूचना फलक या ठिकाणी प्रशासनाकडून लावलेला नाही. गाडीचा ड्रायव्हर जखमी झाला आहे. आता संबंधित कंत्राटदारावर प्रशासन कारवाई करणार का? असा प्रश्न लोहगावकर विचारत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here