Home बुलढाणा शिवसेनेच्या तालुका संघटक पदी राहुल मेटांगे यांची निवड!

शिवसेनेच्या तालुका संघटक पदी राहुल मेटांगे यांची निवड!

35
0

आशाताई बच्छाव

IMG_20231229_073934.jpg

शिवसेनेच्या तालुका संघटक पदी राहुल मेटांगे यांची निवड!

ज्ञानेश्वर पाटील दांदळे ब्युरो चीफ बुलढाणा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या सूचनेवरून व संपर्क प्रमुख नरेंद्रजी खेडेकर यांच्या आदेशावरून तसेच दत्तात्रय पाटील सहसंपर्कप्रमुख, वसंतराव भोजने शिवसेना जिल्हाप्रमुख यांनी एका नियुक्तीपत्राद्वारे राहुल मेटांगे यांची शिवसेना संग्रामपुर तालुका संघटक म्हणून नियुक्ती केली आहे गेल्या अनेक वर्षापासून राहुल मेटांगे हे शिवसेना पक्षात सक्रिय आहेत. तसेच निष्ठावान शिवसैनिक म्हणून त्यांची संग्रामपूर तालुक्यात ओळख असुन 25 डिसेंबर रोजी चिखली येथे नरेंद्रजी खेडेकर यांच्या रायगड या निवासस्थानी सदरची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी बुलढाणा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र भाऊ खेडेकर ,शिवसेना जिल्हा प्रमुख वसंतराव भोजने शिवसेना उप जिल्हा प्रमुख तुकाराम काळपांडे, विधानसभा संघटक भिमराव पाटील ,ता.प्रमुख रविंद्र झाडोकार, नंदकिशोर खोदले सरपंच शेंबा,किसान सेना तालुका प्रमुख अमोल भाऊ ठाकरे ,निलेश होनाळे,संग्रामपूर शहर प्रमुख शुभम घाटे, उप ता.प्रमुख विजय मारोडे, धनंजय पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक अतुल भाऊ बांगर, संतोष रणसिंगे आदी शिवसेना पदाधिकारी तथाशिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here