आशाताई बच्छाव
आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा — संगीतराव भोंगळ
लोकनेते खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पातुर्डा येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन!
ज्ञानेश्वर पाटील दांदळे ब्युरो चीफ बुलढाणा
लोकनेते खासदार शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मा.जिल्हा परिषद उपाध्यक्ष संगितराव भोंगळ (राजू पाटील) यांच्या नेतृत्वात दरवर्षी प्रमाणे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.१६ डिसेंबर रोजी गोदावरी फाउंडेशन व प्रा.आ.केंद्र पातुर्डा यांच्या माध्यमातून भव्य महाआरोग तपासणी शिबिर आयोजन करण्यात येत आहे. या परिसरात सामाजिक कार्यक्षेत्रातील अग्रेसर असलेले. आणि रुग्णांना योग्य उपचार व्हावा याकरिता संगीतराव भोंगळ मागील कित्येक वर्षापासून आरोग्य शिबिर घेऊन आरोग्य शिबिराचा लाभ प्रत्येक गावातील रुग्ण घेत आहे. त्याचप्रमाणे महत्त्वाचे कारण असे की,आपल्या गावातील आणी परिसरातील लोकांना आरोग्याची सेवा मिळावी याकरिता महाआरोग्य शिबिर घेत असतात त्याचे महत्त्वाचे कारण असे की, आपल्या परिसरातील लोकांना आरोग्याची सेवा उपलब्ध व्हावी आपण घेत असलेल्या आरोग्य शिबिरात हजारो रुग्णांच्या तसेच लोकांच्या तपासण्या होत असतात व ज्या गरजू लोकांना आरोग्याच्या काही समस्या आहेत आजार आहे अशा शेकडो लोकांच्या शस्त्रक्रिया ऑपरेशन सुद्धा होत असतात या शिबिर घेण्याचा मुख्य उद्देश असे आहे कि,गावातील शेतकरी असेल शेतमजूर असतील त्यांना शस्त्रक्रिया करत असताना सुविधा घेत असताना आर्थिक त्रास होऊ नये तसेच दवाखान्यामध्ये जो प्रचंड प्रमाणात आर्थिक खर्च लागतो त्यापासून आपल्या परिसरातील रुग्णांना व लोकांचा बचाव व्हावा त्यांना आर्थिक त्रास होऊ नये हा महत्त्वाचा हेतू आहे तसेच आपल्या आया बहिणी असतील त्या स्वतःच्या तब्येतीकडे पाहिजे त्या प्रमाणात लक्ष देत नाहीत,त्या कारणाने आजार मोठा होतो आणि त्याचा सामना पूर्ण परिवाराला करावा लागतो आज आपण दवाखान्याचा जर खर्च पाहिला इतका मोठ्या प्रमाणात असतो की परिवारातील व्यक्ती आजारी पडला व त्या व्यक्तीच्या दवाखान्यासाठी पैसे उभे करत असताना प्रचंड मेहनत त्या परिवाराला घ्यावी लागते म्हणूनच त्या परिवाराला आरोग्य तपासणी शिबिरामुळे खूप मोठी मदत होत असते म्हणून त्या कारणाने आपल्या गावातील व परिसरातील ज्या लोकांना आरोग्य तपासणी करायची आहे त्या लोकांना या आरोग्य शिबिराची माहिती द्यावी जेणेकरून त्यांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देता येईल असे आवाहन शिबिराचे आयोजक संगीतराव भोंगळ यांनी केले आहे.