Home गुन्हेगारी साक्री तालुका हादरला दरोडेखोराकडून तरुणीचे अपहरण

साक्री तालुका हादरला दरोडेखोराकडून तरुणीचे अपहरण

356
0

आशाताई बच्छाव

IMG_20231126_201517.jpg

साक्री तालुका हादरला दरोडेखोराकडून तरुणीचे अपहरण
धुळे/नंदुरबार,(दिपक जाधव ब्युरो चीफ युवा मराठा न्यूज नेटवर्क)- धुळे जिल्ह्यातील साक्री शहरात एक खळबळ उडवून देणारी घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडल्याने संपूर्ण साक्री तालुक्यात नव्हे तर धुळे जिल्हा हादरून गेला आहे.
प्राप्त माहितीनुसार साक्री श ह्यातल्या नवापूर रस्त्या लगत असलेल्या विमलबाई महाविद्यालय शेजारील दौलत नावाच्या बंगल्यावर रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अज्ञात दरोडेखोराकडून बंगल्याचे मालक निलेश पाटील हे बाहेरगावी संगमनेर येथे गेल्याची संधी साधत दौलत बंगल्यावर दरोडा घातला.पाच ते सात लोकांनी हा दरोड घातल्याचा प्राथमिक अंदाज असून हे लोक हिंदी भाषेतून निलेश पाटील यांच्या पत्नी ज्योत्स्ना पाटील यांना धमकावीत व त्याचे हातपाय बांधून तोंडांत बोळा कोंबून घरातील स़ोन्याचे सुमारे पाऊण लाखांचे दागिने लुटून घेऊन गेलेत त्याशिवाय ज्योत्स्ना पाटील यांच्या समवेत निलेश पाटील घरी नसल्यामुळे झोपण्यासाठी आलेल्या निशा शेवाळे या तेवीस वर्षीय तरुणीचे अपहरण या दरोडेखोरांनी केल्यामुळे संपूर्ण धुळे जिल्हा हादरून गेला आहे तर पोलिस प्रशासन अँक्शन मोडवर आले असून पोलिसांनी चार वेगवेगळी पथके तयार करुन दरोडेखोरांच्या शोधार्थ रवाना केल्याची माहिती मिळत आहे तर या गुन्ह्यातील दरोडेखोराना लवकरात लवकर जेरबंद केले जाईल अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे यांनी दिली तर धुळे जिल्हा पोलिस यंत्रणा याकामी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन घटनेवर लक्ष ठेऊन आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here