Home अमरावती पालकांनी आपल्या पाल्यातील चांगुलपणा व बलस्थानांचा शोध घ्यावा. – प्रा. सवई यांचे...

पालकांनी आपल्या पाल्यातील चांगुलपणा व बलस्थानांचा शोध घ्यावा. – प्रा. सवई यांचे पालक मेळाव्या प्रसंगी प्रतिपादन.                 

73
0

आशाताई बच्छाव

IMG-20231104-WA0079.jpg

पालकांनी आपल्या पाल्यातील चांगुलपणा व बलस्थानांचा शोध घ्यावा. – प्रा. सवई यांचे पालक मेळाव्या प्रसंगी प्रतिपादन.                                मयुर खापरे/चादुंर बाजार –
स्थानिक गो. सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे आज दि.४ नोव्हेंबर २०२३ रोजी कनिष्ठ महाविद्यालयीन पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात वैराग्यमूर्ती गाडगेबाबा व संस्थचे संस्थापक अध्यक्ष दानशूर स्व.गोविंदराव दादा टोम्पे यांच्या प्रतिमेला हारार्पन व पूजनाने झाली. याप्रसंगी कार्यक्रमाध्यक्ष तसेच संस्थाध्यक्ष मा. श्री. भास्करदादा टोम्पे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र रामटेके, तसेच प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून सौ. आर. बी सवई मॅडम ( मुख्याध्यापिका बाबाराव ढवळे विद्यालय खराळा ), कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.प्रणित देशमुख, तसेच पालक प्रतिनिधी म्हणून मा. श्री. खोपे सर व महिला पालक प्रतिनिधी सौ. वाकोडेताई व्यासपीठावर उपस्थित होते.
शिक्षक,विद्यार्थी व पालक खऱ्या अर्थाने शिक्षण प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक असल्याने पाल्याची शैक्षणिक प्रगती, त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शिक्षक व पालक यांच्यात सुसंवाद होणे गरजेचे असते यासाठी महाविद्यालयात दरवर्षी अशाप्रकारे पालक मेळाव्याचे आयोजन केले जाते, असे मत कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत प्रा.प्रणित देशमुख यांनी मांडले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व मार्गदर्शक सौ. सवई मॅडम यांनी तालुकास्तरावर तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षण पोहोचावे साठी विशेष प्रयत्न करणाऱ्या मनमिळावी व कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्त्वाचे धनी मा भास्करदादा विषयी गौरवोउद्गार त्यांनी काढले. आजच्या व्यस्ततेच्या जीवनात पालक व शिक्षकांचा सुसंवाद होणे गरजेचे आहे. पालकांनी आपल्या पाल्यातील चांगुलपणाचा व बलस्थानांचा शोध घेऊन त्याला योग्य दिशा देण्याचे कार्य करावे असा मोलाचा सल्ला त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. पालकांनी आपल्या पाल्यातील क्षमता ओळखून त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न करावा, पालकांनी पाल्यावर अपेक्षेचे ओझे न लादता त्यांच्या विचारांना दिशा द्यावी असे मत त्यांनी व्यक्त केले. पालक प्रतिनिधी मा. श्री. खोपे सरांनी आपल्या मनोगतातून मुल हा मातीचा पुतळा नसून तो चैतन्याचा पुतळा आहे, विद्यार्थ्यांच्या तो मुलांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या कलाने मोठे होऊ द्यावे असे मत त्यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडून यावा असाच आमच्या व्यवस्थापनाचा नेहमी यशस्वी प्रयत्न असतो तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीच्या आलेखाची माहिती त्यांनी मेळाव्याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र रामटेके यांनी असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. भास्कर दादा टोम्पे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून काळानुसार विद्यार्थ्यांनी स्वतःला अद्ययावत करावे, विद्यार्थ्यांनी उच्च विचारांचा ध्यास घेऊन आई-वडिलांच्या उपकारांची जाण विद्यार्थ्यांनी सतत ठेवावी असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अंकुश इंगोले, तर आभार प्रदर्शन कु. चांदेकर यांनी मानले. याप्रसंगी कार्यक्रमाला बहुसंख्येने पालक, शिक्षक व विध्यार्थी उपस्थित होते.

Previous articleअखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी संघटनेच्या भंडारा जिल्हा संघटक पदी संदीप ढोके यांची नियुक्ती
Next articleखासदार सुनील मेंढेच्या उपस्थितीत विमानतळ सल्लागार समितीची बैठक
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here