Home उतर महाराष्ट्र निफाड व दिंडोरी तालुक्यातील नागरिकांनी सावध रहा; लहान मुलांना एकटे सोडू नका

निफाड व दिंडोरी तालुक्यातील नागरिकांनी सावध रहा; लहान मुलांना एकटे सोडू नका

708
0

राजेंद्र पाटील राऊत

निफाड व दिंडोरी तालुक्यातील नागरिकांनी सावध रहा; लहान मुलांना एकटे सोडू नका
निफाड: सागर कटाळे युवा मराठा नूज नेटवर्क चॅनेल निफाड तालुका प्रतिनिधी                                                      आज    मंगळवार दि. 21 डिसेम्बर 2021 रोजी जोपुळ-चिंचखेड शिवारात सकाळी सकाळी पिंगुळ साधूच्या वेशात असणाऱ्या भामट्याने सायकलवर शाळेत निघालेल्या एका चिमुरडीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. परंतु चिंचखेड आणि जोपुळ येथील काही सतर्क ग्रामस्थांनी सदर भामट्याला पकडून जोपुळ ग्रामपंचायत येथे कोंडून ठेवले. नंतर वणी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी जोपुळ येथे हजर होत सदर आरोपीस ताब्यात घेतले आहे आणि त्याला अटक करून वणी पोलीस स्टेशनला नेण्यात आले आहे. तरीही सर्व नागरिकांना सूचना आहे की आपल्या लहान मुलांना एकटं सोडू नका. शाळेत पाठवायचे असल्यास कुणी शहाणी व्यक्ती सोबत ठेवा. सदर आरोपीची चौकशी केली असता तो नांदेड जिल्ह्यातील रहिवाशी असल्याचे समजले. सदर व्यक्तीसोबत अजूनही काही भामटे पुरुष व स्त्रिया निफाड तालुका व इतरत्र फिरत असल्याचे सदर भामट्याच्या चौकशीतून समोर आले आहे. पोलीस चौकशीतून सत्य लवकरच बाहेर येईल. परंतु तरीही नागरिकांना कुणीही अनोळखी व्यक्ती, साधू किंवा संशयित व्यक्ती आढळल्यास त्वरित पोलिसांना संपर्क साधा. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नका. आपापल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या आणि आपल्या मुलांना एकटं सोडू नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here