Home नांदेड देगलूर येथे ओबीसी समाजाचे धरणे आंदोलन संपन्न

देगलूर येथे ओबीसी समाजाचे धरणे आंदोलन संपन्न

90
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231028-062918_WhatsApp.jpg

देगलूर येथे ओबीसी समाजाचे धरणे आंदोलन संपन्न

देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे)

देगलूर :-ओबीसी, एन टी, व्ही.एन.टी , एसबीसी समाजातील भटक्या जाती ,अलुतेदार, बलुतेदार, समाजातील वेगवेगळ्या जाती संघटनानी दिनांक 26 ऑक्टोबर 2023 रोज गुरुवारी सकाळी दहा ते दुपारी तीन पर्यंत खालील मागण्यासाठी धरणे आंदोलन केले. ओबीसी प्रवर्गाची जातनिहाय जनगणना करणे, यापुढे ओबीसी प्रवर्गात कुठल्या जातीचा समावेश न करणे ,ओबीसी प्रवर्गाला धक्का लावण्यात येऊ नये, शासनाने कंत्राटी नोकर भरती चा जीआर रद्द करावा. ओबीसी प्रवर्गासाठी प्रत्येक जिल्ह्यात मुलं व मुलीसाठी दोन वसीगृह सुरू करावे. ओबीसी आर्थिक विकास महामंडळाच्या जाचकाठी रद्द कराव्यात. ओबीसी समाजावर लाभलेली असवैधानिक नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात यावी. महा ज्योती मध्ये संशोधन करण्यासाठी ओबीसी प्रवर्गाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात पाच हजार विद्यार्थ्यांना छात्रावृती देण्यात यावी. या व विविध मागण्यासाठी गंगाधरराव भांगे यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी कार्यालय देगलूर येथे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात धोबी समाजाचे दिगंबरराव दाऊबे, उत्तमराव वाडीकर, मा जिल्हा परिषद सदस्य निवृत्ती कांबळे जोशी समाजाचे धनाजी जोशी,दिगंबरराव तमलुरकर ,यादव मुत्तेपवार, बालाजीराव ढगे,सुरेश रोहिले, सुरेशराव स्वर्णकार ,सेवानिवृत्त पीएसआय रणवीरकर साहेब राजू पंडलवार, संतोष मांडे ,लक्ष्मण सांगवीकर, बालाजी वाघमारे, सूर्यवंशी साहेब ,निरामुद्दीन ,रामास्वी पेंटय्या, अनंत राजूरे या सह नांदेडहून गोविंदराम सुरनर गोडसे महाराज,नागनाथराव देशमुख, नामदेव पांचाळ संजय कद्रेकर माधव गरुडकर बालाजी गरुडकर दत्ता आजणीकर शंकर आटकळिकर सुभाष बोधनकर शंकर चाटलूरकर गजानन दाऊबे गंगाधर दाऊलवार विजय यन्नवार संजय हळदे संजय जोशी शैलेश उल्लेवार माधव येसगे अवधूत राजकुंटवार कैलास येसगे शिवाजी मुत्तेपवार शिवलाल वाघमारे यांची उपस्थित होते यासह बहुसंख्य ओबीसी समाजातील कार्यकर्ते जात संघटनांचे अध्यक्ष पदाधिकारी उपस्थित होते

Previous articleघराघरात कीर्तनाची गोडी वाढविणारे ज्येष्ठ निरुपणकार हरपले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Next articleदेगलूर तालुका व गाव बंदी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here