Home संपादकीय व-हाणे प्रकरणात वेंदेची (अ) कर्तबगारी भाग २

व-हाणे प्रकरणात वेंदेची (अ) कर्तबगारी भाग २

123
0

राजेंद्र पाटील राऊत

20230823_203839-BlendCollage.jpg

संपादकीय अग्रलेख..
व-हाणे प्रकरणात वेंदेची (अ) कर्तबगारी भाग २
वाचकहो,
आपल्या पौराणिक काळात राम ज्यावेळी वनवासाला निघालेत त्यावेळी एकनिष्ठ व बंधूप्रेमाला जागणा-या भरतने रामाचे जोडे (पादुका) सिंहासनावर ठेऊन इमाने इतबारे अयोथ्येचा राज्यकारभार चालविल्याचा इतिहास आजही आपल्याला ग्रंथातून उदबोधीत करतो.पण…या कलियुगातल्या भरतला शासनाने बहाल केलेल्या अधिकाररुपी जोडे (पादुका) चा योग्य जागेवर वापर करून न्याय करण्याऐवजी भरत नेमके कुणाचे जोडे उचलण्यात धन्यता मानत आहे,हे देवच जाणो! ख-यांचे खोटे करण्यात माहिर असलेल्या व-हाणे ग्रामपंचायतीच्या प्रत्येक लबाडीच्या व खोटेपणाच्या कृत्यांवर पांघरुण घालण्याचे महापाप भरत वेंदे हे करीत आहेत.गंभीर प्रकार असतानाही हेतूत त्याकडे कानाडोळा करुन दोषी लबाडांना पाठीशी घालण्याचे धंदे कलियुगातल्या भरतने चालविल्याने सर्वसामान्यांचा लोकशाहीवरील विश्वास उडण्यास या घटनेमुळे आता वेळ लागणार नाही.गत तीन वर्षात व-हाणे ग्रामपंचायतीच्या पदाधिका-यांचे अनेक लबाडीचे पुरावे गटविकास अधिकाऱ्यांना देऊन सुध्दा वेंदेना साधा घामही फुटू नये म्हणजे प्रशासनातले अधिकारी किती मस्तवाल व निर्ढावलेले आहेत,याचा यानिमिताने प्रत्यय येतो.बेशरमपणाचा कळस गाठणे कशाला म्हणतात हे या प्रशासनातल्या निगरगठ्ठ अधिकाऱ्यांकडून सर्वसामान्य जनतेने शिकण्याची वेळ येऊन ठेपली आहे.व-हाणे प्रकरणात लांडयालबाडया करणाऱ्यांना वारंवार वाचविण्यासाठी वेंदेंनी खुलाश्यावर खुलासे करण्याची संधी देणे म्हणजे एकंदरीत चोराला पुन्हा चोऱ्या करायला मार्ग मोकळा करुन देणे व त्याला प्रोत्साहन देणे हेच या कलियुगातल्या भरतचे इमाने इतबारे काम सुरु आहे.वास्तविक तसे बघितले तर कलियुगातील भरत नेमके जोडे कुणाचे उचलत आहे? शासनाने बहाल केलेल्या अधिकाराचे कर्तव्य तरी खरोखरच प्रामाणिकपणे पार पाडतो किंवा नाही हा देखील प्रश्नच आहे.तालुक्याच्या गचाळ व टुकार राजकारणाचा व मुठभर पुढाऱ्यांच्या हाताचे खेळणे होऊन तर हा सगळा उपव्द्याप भरत करत नाही ना? तसे असेल तर ती मोठी शोकांतिकाच ठरेल.कारण कलियुगातल्या या भरतला या सगळ्या प्रश्नांची उतरे लवकरच महाराष्ट्राचे मा.लोकआयुक्त व मुंबई उच्च न्यायालयासमोर द्यावी लागणार आहेत,हे येणारा काळच दाखवून देईल.
उद्याच्या अंकात वाचा- व-हाणे प्रकरणात सौ चुह्हे खाके बिली चल हज को…!

Previous articleव-हाणे प्रकरणात वेंदेची (अ) कर्तबगारी भाग -१ ला
Next articleव-हाणे प्रकरणात वेंदेची (अ) कर्तबगारी -भाग ३ धाडसी दळवी ताईंना मानाचा सलाम…! तर सौ चुह्है खाके बिल्ली चली हज को!!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here