Home उतर महाराष्ट्र ककाणीच्या आदर्श माध्यमिक विद्यालयात इको फ्रेन्डली गणेश मुर्ती स्पर्धा संपन्न

ककाणीच्या आदर्श माध्यमिक विद्यालयात इको फ्रेन्डली गणेश मुर्ती स्पर्धा संपन्न

110

आशाताई बच्छाव

IMG-20230923-WA0032.jpg

म्हसदी,(प्रतिनिधी श्रीहरी बोरसे):–साक्री तालुक्यातील ककाणी येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनविण्याची स्पर्धा घेण्यात आली. गेल्या दोन वर्षापासून विद्यालयात विद्यार्थी इको फ्रेंडली गणेश मूर्ती साकारत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्याचा उपक्रम विद्यालयात राबविला जात आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी शेताच्या बांधावरील तसेच पडक्या घरांची माती, मुंग्यांचे वारूळची माती तसेच शाडूची माती आणून वेगवेगळ्या आकाराच्या गणेश मूर्ती तयार केल्या आहेत. तसेच या मूर्तींना नैसर्गिक रंगाचा वापर करून पर्यावरण पूरक गणेश मूर्तीचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी दाखवले. यावेळी तीस ते पस्तीस विद्यार्थ्यांनी नैसर्गिक रंगाचा वापर करून गणेशाच्या मूर्ती तयार केल्या आहेत. यावेळी मुख्याध्यापक भटू वाणी यांनी पर्यावरणाचे महत्त्व सांगून इको फ्रेंडली गणेश उत्सव दरवर्षी साजरा करा असे आवाहन केले. त्यानंतर या गणपतीचे परीक्षण साने गुरुजी शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष शिवाजी सोनवणे, सचिव उत्तम बेडसे, संचालक बारकू बेडसे,अरुण बेडसे, रावसाहेब बेडसे, ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच निंबा नाना बेडसे, टी.व्ही. शिंदे आदींनी केले. यावेळी कलाशिक्षक के.व्ही. देवरे व एन.डी. शिंदे यांनी विद्यार्थ्यांना गणेश मूर्ती बनविण्यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापक भटू वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली व्ही.वाय.कुवर, जी.एम.मारणर, पी.डी. शेवाळे, बी.आर.सोनवणे, प्रसाद बेडसे, सुषमा महाले आदींनी परिश्रम घेतले.

Previous articleगणपती व ईद मिलाद निमित्त भातकुली शहरात पोलिसांनी काढला रुड मार्च
Next articleआम आदमी पार्टी अमरावती कडुन सोमवार ला राजकमल चौक येथे शासनाच्या कंत्राटी नोकर भरती निर्णया विरोधात निषेध आंदोलन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.