Home जालना शेतकऱ्यांच्या उसाला  समृद्धी कारखान्याचा मराठवाड्यात उच्चांकी दर  : सतीश घाटगे

शेतकऱ्यांच्या उसाला  समृद्धी कारखान्याचा मराठवाड्यात उच्चांकी दर  : सतीश घाटगे

77
0

आशाताई बच्छाव

IMG-20230921-WA0036.jpg

शेतकऱ्यांच्या उसाला  समृद्धी कारखान्याचा मराठवाड्यात उच्चांकी दर  : सतीश घाटगे

एफआरपी पेक्षा ११० रुपये वाढीव मोबदला : २८०० रुपये टनप्रमाणे देणार अंतिम  बिल :

घनसावंगी/अंबड,(ब्युरो चीफ दिलीप बोंडे) :- गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये गाळप  झालेल्या शेतकऱ्यांच्या उसाला  घनसावंगी तालुक्यातील समृद्धी साखर कारखान्याने  एफआरपी पेक्षा ११० रुपये वाढीव मोबदला देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे  गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये  अंबड –घनसावंगी तालुक्यातील  शेतकऱ्यांच्या उसाला मराठवाड्यात  उच्चांकी दर देणारा साखर कारखाना म्हणून समृद्धी कारखाना आघाडीवर राहीला आहे. समृद्धी कारखान्याचे व्हाईस चेअमरन महेंद्र मेठी यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या  संचालक मंडळाच्या  बैठकीत  शेतकऱ्यांना ११० रुपये बोनस देण्याचा निर्णय झाल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी गुरुवारी घनसावंगी येथे  आयोजित पत्रकार परिषदेत  दिली.
गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये  गाळप  झालेल्या  शेतकऱ्यांच्या उसाला समृद्धी कारखान्याने  सुरुवातीला २ हजार ३०० रुपये प्रती मेट्रिक टन  या प्रमाणे पहिला हप्ता दिला. त्यानंतर शेतकऱ्यांना  २०० रुपये प्रति मे.टन प्रमाणे वाढीव  दुसरा हप्ता वितरीत करण्यात आला.  बैलपोळा सणावर दुष्काळाचे सावट असल्यामुळे  शेतकरी चिंतेत होता. या महत्वाच्या सणासाठी कारखान्याचे चेअरमन  सतीश घाटगे व संचालक मंडळाने  सर्व ऊस उत्पादक  शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी उसाचा वाढीव तिसरा हप्ता देण्याचा निर्णय घेतला. हा वाढीव हप्ता १०० रुपये प्रती मे.टन याप्रमाणे देण्यात आला.अशा प्रकारे समृद्धी कारखान्याकडून शेतकऱ्यांच्या  उसाला आतापर्यंत  २ हजार ६०० रुपये प्रती टन एवढी रक्कम अदा करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here