Home मुंबई स्वराज्य पोलिस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना

स्वराज्य पोलिस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना

92
0

आशाताई बच्छाव

IMG-20230818-WA0033.jpg

स्वराज्य पोलिस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना
सविता तावरे मुंबई स्पेशल रीपोर्टर
स्वराज्य पोलिस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्यावतीने, माननीय संस्थापक अध्यक्ष श्री. दिपकजी कांबळे आणि माननीय मुख्य महासचिव श्री कमलेशजी शेवाळे (देवासर) यांच्या निर्देशानुसार,
स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटना आणि लुंबिनीनगर रहिवाशी कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सौ. ज्योतीताई पाटेकर आणि सौ.अलका नागटिळक तसेच तेथील सूनबाई म्हणजे आपल्या वैशाली कांबळे यांच्या विशेष सहकार्याने आज रविवार, दि. १३ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ठीक ११:०० वाजता मानख़ुर्द, मंडाला गाव येथे ज्येष्ठ नागरिक सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला होता आणि या विभागात पहिल्यांदाच असा छान कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमास स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संचालक तथा मुंबई अध्यक्षा सौ. सविताताई तावरे, मुंबई प्रभारी श्री मालतेशसर हेब्बारे, मुंबई विभाग उपाध्यक्ष पुजाताई सुर्वे, मुंबई विभाग समन्वयक सौ. रुपालीताई भोसले, मुंबई विभाग संघटक सौ.वैशालीताई कांबळे, मुंबई विभाग मिडीया तथा प्रसिद्धी प्रमुख श्री. संजय निराळे, ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष श्री. संदीप वाघमारे, ईशान्य मुंबई सचिव श्री.आनंद वैराळ, ईशान्य मुंबई जिल्हा समन्वयक सौ.ज्योतीताई पाटेकर, मानखुर्द सहसंघटक सौ.अलकाताई नागटिळक, घाटकोपर अध्यक्षा सौ. निमाताई प्रजापती आणि घाटकोपर कार्यध्यक्ष श्री.सिध्दार्थ गज्जेली आदी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच मुंबई विभाग उपाध्यक्षा सौ सविताताई चाकणे, ईशान्य मुंबई प्रवक्ता समीर नाईक,ईशान्य मुंबई जिल्हा संपर्कप्रमुख सौ संगीता मांडे आणि घाटकोपर अध्यक्षा संजीवनी लोखंडे यांना उपस्थित राहता आले नाही परंतु यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला जवळ जवळ 60 जेष्ठ नागरिक उपस्थित होते. या सर्व जेष्ठ नागरिकांना गुलाब पुष्प,मेडिसिन बॉक्स,आणि accupressure पॉईंट exercise करण्यासाठी अंगठी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यासाठी वसंत मालिनी संस्थेचे श्री.किशोर माने यांनी ही मदत केली. स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे मुंबई प्रभारी मालतेशसर हेब्बारे यांनी जेष्ठ नागरिकांसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजना आणि त्या योजनांचा लाभ कसा घ्यावा ह्या विषयी सविस्तर माहिती दिली. संचालक तथा मुंबई विभाग अध्यक्षा सौ.सविताताई तावरे यांनी आपल्या स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या कार्याविषयी माहिती उपस्थितांना दिली आणि संघटनेच्यामाध्यमातून जेष्ठनागरिक यांना मदतकरण्याचेआश्वासनदिले. मुंबई विभाग उपाध्यक्षा पूजा सुर्वे यांनी जेष्ठ नागरिकांनी कसे जगले पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले. ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष संदीप वाघमारे यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या, मुंबई विभाग संघटक वैशाली कांबळे यांनी जेष्ठ नागरिकांचे दिवस कसे असावेत याबद्दल छान असे आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात उपस्थित असलेले मान्यवर श्री. किशोर चव्हाणसर यांनी घरगुती उपचार व आरोग्य विषयक मोलाचे मार्गदर्शन ह्या ठिकाणी केले. या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले सुरक्षा इंडियाचे श्री. सूर्यकांत कांबळेसर यांनी घरगुती वापरात असणारा LPG गॅस सिलिंडर वापरताना कोणती व कशी काळजी घ्यावी ह्याविषयी छान मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानखुर्द सहसंघटक सौ.अलकाताई नागटिळक यांनी उत्तमरीत्या केले. अलका नागटिळक यांना संघटनेचे ID card आणि नियुक्ती पत्र त्यांच्या आई च्या हस्ते प्रदान करण्यात आले. सर्व जेष्ठ नागरिकांना बाई पण भारी देवा हा चित्रपट पहायला घेऊन जायचे आश्वासन श्री कैलास डावरे यांनी दिले आणि स्नेहभोजनासह कार्यक्रमाचा समारोप केला.
लुंबिनीनगर को-ऑप हौसिंग सोसायटी रजिस्टर या संस्थेतील रहिवाशांचे पुनर्वसन १९६९ या वर्षी बी ए आर सी प्रशासनाने त्यांच्या जागेत केले आहे. तेव्हापासून आजपर्यंत मूलभूत सुविधा पुरविल्या गेल्या नाहीत. उदाहरणार्थ वसाहतीत मुख्य रस्ता नाही, त्यामुळे रुग्णांसाठी रुग्णवाहिका येऊ शकत नाही, तसेच शौचालयाची गैरसोय आहे तसेच वसाहतीची घरे मातीची बांधलेली आहेत. तसेच त्यांची वसाहत डोंगराच्या पायथ्याशी आहे. ईरशाळवाडी व माळीण गाव होण्यास वेळ लागणार नाही तरी प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करून त्यांचे पुनर्वसन चांगल्या ठिकाणी करावे.

Previous articleरिपब्लिकन सेनेच्या आंदोलनास अखेर यश
Next articleनाशिकमध्ये स्वातंत्र्यदिनी बालकांना साहित्य वाटप
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here