Home उतर महाराष्ट्र आवरे कुटुबियाना 40 लाख रुपयांचा धनादेश पी शिवा शंकर यांच्या हस्ते देण्यात...

आवरे कुटुबियाना 40 लाख रुपयांचा धनादेश पी शिवा शंकर यांच्या हस्ते देण्यात आला           

136
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230729-205451_WhatsApp.jpg

आवरे कुटुबियाना 40 लाख रुपयांचा धनादेश पी शिवा शंकर यांच्या हस्ते देण्यात आला             राहाता प्रतिनिधी मोहसीन तांबोळी शिर्डी –
श्री साईबाबा संस्‍थानचे कायम कर्मचारी कै.‍दीपक आवारे यांच्या अपघाती मृत्यू नंतर “ शासकीय कर्मचारी पगार (Salary) बचत खाते योजना अपघातग्रस्‍त विमा कवच योजने ” अंतर्गत उपलब्‍ध झालेल्‍या विमा रक्‍कमेचा चाळीस लाख रूपयांचा धनादेश आज संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर यांचे हस्‍ते कै.‍दीपक आवारे यांच्‍या पत्‍नी रेखा आवारे यांना सूपुर्द करणेत आला.
श्री साईबाबा संस्‍थानचे कायम कर्मचारी कै.‍दीपक आवारे यांचा काही दिवसांपूर्वी दुर्दैवी अपघाती मृत्‍यू झाला होता. बॅंक ऑफ बडोदा शिर्डी शाखेत त्यांचे वेतन खाते होते. या शाखेतील शासकीय कर्मचारी पगार (Salary) बचत खाते योजना अपघातग्रस्‍त विमा कवच योजने ” अंतर्गत कै.आवारे यांच्या वारसदार त्यांच्या पत्नी रेखा आवारे यांना रुपये 40 लाखाचा विमा संरक्षण मंजूर झाले होते.आज या रकमेचा धनादेश संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर यांच्या हस्ते त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला, यावेळी संस्‍थानचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव, प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे, बॅक ऑफ बडोदाचे क्षेत्रीय प्रबंधक,श्री.किशोरबाबु के.व्‍ही.के. व उप क्षेत्रीय प्रबंधक अतुल शिर्के,औरंगाबाद, शाखा प्रबंधक शिर्डी यांच्यासह संस्‍थान कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here