आशाताई बच्छाव
आ.अभिमन्यु पवार यांच्या पुढाकाराने वडार समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन
वडार समाजाच्या वतीने विधानभवनात सत्कार
दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड
देशाच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल ७५ वर्षानंतर वडार समाजासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापन झाले. मागील आठवड्यात मंत्रिमंडळ बैठकीत त्यास मान्यता देण्यात आली. त्यामुळे या महामंडळाचे जनक आ.अभिमन्यू पवार यांचा वडार समाजाच्या वतीने विधानभवनात सत्कार करण्यात आला.
गेल्या कित्येक दिवसांपासून वडार समाजासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापन करण्यात यावे अशी वडार समाजाची मागणी होती. ३ जुन २०१८ रोजी लातूर येथे तत्कालीन मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली वडार समाजाचा भव्य मेळावा झाला होता. त्या मेळाव्याचे संपूर्ण आयोजन तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक व आ.अभिमन्यू पवार यांनी केले होते. या मेळाव्यात वडार समाजाने स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली होती. याची दखल घेत तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांच्या दालनामध्ये दि.१९ नोव्हेंबर २०१८ रोजी आ.अभिमन्यु पवार यांची बैठक झाली. महामंडळाबाबत चर्चा होऊन ११ मेरिट निघाले. वडार समाजाच्या विकासासाठी, समाजातील गोरगरीब लोकांच्या रोजगारासाठी आणि विकासासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची स्थापना होणे ही खूप गरजेची गोष्ट होती. आ.अभिमन्यू पवार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे दि.९ मार्च २०२३ रोजी झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये वडार समाजासाठी पै.मारुती चव्हाण आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानंतर मागील आठवड्यात पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत वडार सामाजासाठी पै.मारुती चव्हाण आर्थिक विकास महामंडळास मान्यता देण्यात आली. वडार समाजाला प्रथमच गेल्या ७५ वर्षात न्याय मिळवून दिला गेला. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील वडार समाजाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने विधानभवनात आ.अभिमन्यू पवार यांचा हृदय सत्कार करण्यात आला. वडार समाजाच्या वतीने अभिमन्यू पवार यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
याप्रसंगी रवि शिंदे, प्रदेशाध्यक्ष शिवक्रांती वडार फाउंडेशन महाराष्ट्र, उपाध्यक्ष भाजपा भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र, नितीन वाघमारे, राजु जाधव, पिराजी मंजुळे, बलराज वारकर, वसंत गुंजाळ, सदाशिव जाधव, अनिल शेलार, शंकर माने, राजु सुर्यवंशी, समाधान कापसे, सुकदेव गुंजाळ, शरद जाधव आदी समाज बांधव उपस्थित होते.






