Home सोलापूर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आज सोलापुरात

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आज सोलापुरात

127
0

आशाताई बच्छाव

IMG-20230620-WA0010.jpg

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आज सोलापुरात

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोल्हे या मंगळवार, २० जून रोजी सोलापूर दौऱ्यावर येत असून दुपारी १२.३० वाजता त्यांचे पुणे येथून सोलापुरात आगमन होणार आहे. दुपारी २.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पंढरपूर आषाढी वारीनिमित्त प्रशासकीय नियोजन व पंढरपूर विकास आराखडा आढावा बैठकीस उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीस प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, पंढरपूर नगरपालिका, पुरातत्त्व खात्याचे अधिकारी व मंदिर समितीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. दुपारी चार वाजता शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अस्मिता गायकवाड व मनोरमा परिवाराने आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. दुपारी ४.३० वाजता शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील महिला शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संवाद तर सायंकाळी ५.३० वाजता शिवसेना पदाधिकान्यांशी संवाद साधणार आहेत. रात्री सोलापुरात मुक्काम राहणार आहे. बुधवारी सकाळी ८.३० वाजता त्या पंढरपूरकडे रवाना होणार आहेत. तेथे सकाळी १० वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे दर्शन व पदाधिकाऱ्यांशी भेट व चर्चा करून दुपारी पुण्याकडे प्रयाण करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here